जळगाव: भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना संकट मोचक नेते म्हणून संबोधलं जातं. मात्र ते संकट कोणाचा सोडवतात? तर देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे. ते संकट मोचक नेते आहे. तुमचे वजन आहे. मग का म्हणून शेतकऱ्यांना अनुदान आलं नाही. सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमची वजन का वापरत नाहीत, असंही ते म्हणालेत.
गिरीश महाजन संकट मोचक नेते ते फडणवीसांवरील संकट...
गिरीश महाजन आमदार झाले, मंत्री झाले. मात्र, मंत्री झाल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी काय केलं. मोठी-मोठी खाती त्यांच्याकडे होती. जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं. मतदारसंघ शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम झाला असता. काय विकास केला गिरीश महाजनांनी. काल-परवा मी एक व्हिडिओ बघितला. ते दुचाकी वर बसले होते, पण चिखलातून त्यांना जाता आले नाही. एखाद्या नेत्याची जर अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचं काय? आरोग्यामध्ये मोठं काम केल्याचं ते नेहमी सांगतात. मात्र, आरोग्याची सेवा देण्यासाठी बाहेर का घेऊन जातात याच ठिकाणी असे एखादी मोठा हॉस्पिटल का तयार झालं नाही. गिरीश महाजन संकट मोचक नेते आहेत. मात्र, संकट कोणाचा सोडवतात? देवेंद्र फडणवीस यांच्यावर संकट आलं तर ते सोडवतात असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
ते संकट मोचक नेते आहे. तुमचे वजन आहे. मग का म्हणून शेतकऱ्यांना अनुदान आलं नाही. सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमची वजन का वापरत नाही. असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. जामनेर येथे दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ सभेत रोहित पवार यांचा गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
गिरीश भाऊंनी काही उद्योग आणले का?
तुमच्या तालुक्यामध्ये गिरीश भाऊंनी काही उद्योग आणले का, डिग्री घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही. सरकार महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या भ्रष्टाचार करतात. तलाठी भरतीसाठी तर एकेक जणांकडून 35-35 लाख रुपये घेतले जातात. देवेंद्र फडणवीस यांना मागच्या दरवाजातून कॉन्ट्रॅक्ट भरती केली. 27 हजार कॉन्ट्रॅक्टमध्ये भरती केली. कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला तर आपल्या भाजपच्या लाडक्या आमदाराला, असं म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना देखील लक्ष्य केलं आहे.
भाजपने सत्तेत आल्यापासून फक्त गुजरातचा विकास केला
भाजपने सत्तेत आल्यापासून कोणाचा विकास केला, तर तो विकास फक्त गुजरातचा विकास केला. मुलांना कॉटनचा गणवेश देणे अपेक्षित होते. मात्र, यांनी गुजरातमधील इलेक्शन नावाचा कापड आणला आणि त्याची गणवेश दिले. अजूनही 50% मुलांना गणवेश मिळालेला नाही. जिथे मिळेल तिथे या भाजप सरकारला पैसा खायचा आहे आणि तो निवडणुकीत वापरायचा आहे. पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सहा ते सात हजार कोटी रुपये ते आता निवडणुकीसाठी वापरते. लोकसभेमध्ये सुद्धा त्या-त्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे नेत्यांनी दीडशे दीडशे कोटी रुपये खर्च केला होता, असं असतानाही राज्य जनतेने 31 खासदार हे आपल्या विचाराची निवडून दिले, असं पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
गोडाऊन भरून पैसा ठेवलेला आहे तो...
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैसे, दागिने आणि मोठ्या प्रमाणावर रक्कम पकडली जात आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करून आपल्या उमेदवाराच्या विरोधात वापरला जाऊ शकतो, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. रोहित पवार बोलताना म्हणाले, गोडाऊन भरून पैसा ठेवलेला आहे आणि हा पैसा आपल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीमध्ये वापरला जाऊ शकतो. कितीही पैसा आला तरी आपल्या लाडक्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला विजय करायचा आहे, असं आवाहन देखील यावेळी रोहित पवारांनी केलं आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे जर एखादा अधिकारी काम करत असेल. तर त्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे. पोलीस प्रशासनाला सांगायचा आहे. वीस दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असंही रोहित पवार यावेळी म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस नव्या युगातले ते जनरल डायर
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून जालना येथे उपोषण करणाऱ्यांवर लाठी चार्ज करायला सांगितला. देवेंद्र फडणवीस अभिमन्यू आहेत का नाहीत, हे मला माहित नाही. मात्र, या नव्या युगातले ते जनरल डायर मात्र नक्की आहेत. वारकरी संप्रदायाच्या लोकांना सुद्धा यांनी सोडलेले नाही. त्यामुळे अतिशय चुकीच्या प्रवृत्तीचे हे लोक आहेत.त्यामुळे महायुतीचे नेत्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.