Sagittarius Horoscope Today 2nd April 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या नोकरीत बदल बघायला मिळतील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तसेच, घरातील ज्येष्ठ सदस्यांबरोबर बसून तुम्हाला पैशांची बचत कशी करायची? पैसे कसे गुंतवायचे? हे समजून घ्या. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जे आजवर विनाकारण पैसे खर्च करत होते, त्यांनी उद्या स्वतःवर नियंत्रण ठेवावे आणि पैसा वाचवावा. आज तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत अशा गोष्टी करा, ज्याबद्दल तुम्ही अनेकदा विचार करत होतात.
अनुभवी लोकांचा सल्ला घ्या
कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत.
आजचे धनु राशीचे आरोग्य
आज सर्दी किंवा डोकेदुखीमुळे तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला अस्वस्थ वाटेल. अति थंड पदार्थांचे सेवन कमी करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
धनु राशीसाठी आजचे उपाय
विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा. आज तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हिरवा मूग दान करा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :