Sagittarius Horoscope Today 29 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope)  लोकांसाठी आजचा दिवस पूर्वीच्या दिवसांपेक्षा चांगला आहे. आज नोकरीत उच्च अधिकार्‍यांकडून लाभ होईल. तुम्ही केलेल्या कामावर सर्वजण खूश होतील. व्यवसायातील बदलांबाबत चांगली बातमी मिळेल. छोट्या व्यापाऱ्यांनाही आज व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुमच्या प्रेम जीवनात आनंद राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला वरिष्ठ सदस्यांकडून पैसे कसे वाचवायचे हे शिकायला मिळेल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. नोकरदार लोक त्यांच्या नोकरीसोबत कोणतेही नवीन काम सुरू करू शकतात, जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढू शकेल. 


कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर धनु राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक पाहुण्यांचे आगमन होईल. मित्रांसोबत सहलीला जाण्याचा देखील प्लॅन आज करू शकता. मित्राशी झालेले वाद आज मिटतील. आजचा दिवस संगीताची आवड जपण्यात जाईल. वेगवेगळ्या धाटणीचे संगीत ऐका.


तुम्हाला नशिबाची साथ मिळेल


धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्यात परोपकाराची भावना विकसित होईल. धार्मिक विधींमध्ये परिश्रमपूर्वक काम कराल, ज्यामुळे तुमच्या मनातील श्रद्धा वाढेल. संध्याकाळी पोटात दुखण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच सावधगिरी बाळगा आणि खाण्यापिण्यावर संयम ठेवा. तेलकट पदार्थ टाळा. 


समाजसेवेपासून दूर राहा


नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिकदृष्ट्या अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवेपासून दूर राहा. मुलांच्या बाबतीत काही कारणांवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. घरगुती वातावरण चांगले कसे राहील यासाठी प्रयत्न करा. 


आजचे धनु राशीचे आरोग्य 


धनु राशीच्या लोकांना पाठदुखीची समस्या असू शकते. भुजंग आसन केल्याने खूप फायदा होईल.


धनु राशीसाठी आजचे उपाय 


आज तीन झाडू खरेदी करा आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जवळच्या मंदिरात ठेवा.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग


 धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 29 May 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य