Sagittarius Horoscope Today 21st March 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज तुम्हाला नोकरीत (Job) यश मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक समस्या त्रासदायक असू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात (Married Life) तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच, आज बेरोजगारांना रोजगार मिळण्याचेही संकेत आहेत. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र देखील भेटू शकतो. ज्याच्यासोबत तुमच्या बालपणीच्या आठवणी (Childhood Memory) ताज्या होतील. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेतील. परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचीही मदत घ्या. उच्च शिक्षणासाठी (Higher Education) काळ चांगला आहे.


अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 


कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 


शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. 


आजचे धनु राशीचे आरोग्य


आज सर्दी किंवा डोकेदुखीमुळे तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला अस्वस्थ वाटेल. अति थंड पदार्थांचे सेवन कमी करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.


धनु राशीसाठी आजचे उपाय


विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा. आज तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हिरवा मूग दान करा.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य