Sagittarius Horoscope Today 20 April 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांना आज अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यांच्या करिअरमध्ये नाव कमावण्याची संधीही मिळेल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या तब्येतीत चढ-उतार जाणवतील, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल. अशा वेळी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवास आणि शिक्षणाशी (Education) संबंधित काम तुमची जागरूकता वाढवेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा काळ कठीण आहे. तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आईचा सहवास मिळेल. वडिलांच्या माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्या लोकांना उद्या चांगला व्यवहार होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.


अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 


कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 


शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. 


आजचे धनु राशीचे आरोग्य


आज सर्दी किंवा डोकेदुखीमुळे तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला अस्वस्थ वाटेल. अति थंड पदार्थांचे सेवन कमी करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.


धनु राशीसाठी आजचे उपाय


विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा. आज तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हिरवा मूग दान करा.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य