Sagittarius Horoscope Today 17 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला व्यवसायातील (Business) बदलाबद्दल चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. रागाचा अतिरेक टाळा. पैसे खर्च करताना बचतीची काळजी घ्या. आज जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवा. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जिथे सर्व लोकांशी सलोखा होईल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना कुटुंबाची (Family) उणीव भासेल. जे लोक परदेशातून व्यवसाय करत आहेत, त्यांना अपेक्षित लाभ मिळतील. लव्ह लाईफ जगणारे लोक आपल्या प्रेयसीसोबत आनंदी दिसतील. घरी पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. जोडीदाराच्या (Life Partner) प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.


अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 


कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 


शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. 


आजचे धनु राशीचे आरोग्य


धनु राशीचे लोक कामाच्या वेळी काही गोष्टींमुळे मानसिक तणावात राहू शकतात. दररोज सकाळी चालणे आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.


धनु राशीसाठी आजचे उपाय


मंदिरात किंवा कोणत्याही व्यक्तीला सुके नारळ अर्पण करा आणि संध्याकाळी भगवान शंकराचे ध्यान करा.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 17 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य