Sagittarius Horoscope Today 11 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नवीन संपर्क वाढतील. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत, त्यांनाही भरपूर नफा मिळेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळणार नाही. शैक्षणिक (Education) कामात सुधारणा होतील. आज कोणालाही विचार न करता पैसे देऊ नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्हाला जोडीदाराचं (Life Partner) पूर्ण सहकार्य मिळेल.
मानसिक तणावापासून दूर राहा
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुमचे काम लांबणीवर पडेल. आज तुमचे खर्च तर होतीलच, पण तुमच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल. आज मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहन जपून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहील, परंतु वैयक्तिक जीवनात तणाव सुरू होऊ शकतो.
आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु पैशाच्या बाबतीत, तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील.
आजचे धनु राशीचे आरोग्य
धनु राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु मनोबल कमी होईल. नकारात्मक विचारांच्या प्रभावशाली लोकांपासून दूर राहा.
धनु राशीसाठी आजचे उपाय
शत्रू आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चार तोंडी दिवा लावा.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :