Sagittarius Horoscope Today 10th March 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला नोकरीसंदर्भात चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कामात येणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला लाभ मिळतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कामात येणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला लाभ मिळतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल. जे आपला व्यवसाय पुढे वाढविण्याचा, मोठा करण्याचा विचार करत होते. त्यांना यश मिळेल. घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
विनाकारण कोणतीही जबाबदारी स्वत:वर ओढवून घेऊ नका. त्यामुळे तुम्हाला त्यात गुंतून राहावे लागेल. सध्या स्वत:ला मोकळेपणाने कसे जगता येईल याचा विचार करा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत होणारा संघर्ष कमी होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा.
जोडीदाराचा पाठिंबा मिळेल
राजकीय क्षेत्रात कार्यरत राहा. व्यसनी मित्रांपासून दूर राहा. मुलांच्या बाबतीत कोणताही गैरसमज करुन घेऊ नका. तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहिल.
आजचे धनु राशीचे आरोग्य
जास्त कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. तसेच काही काळ शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे.
धनु राशीसाठी आजचे उपाय
आदित्य स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :