Sagittarius Horoscope Monthly : एप्रिल महिन्यात धनु राशीच्या लोकांना सामाजिक कार्यात सक्रिय राहावे लागेल. परोपकार म्हणून केलेले काम तुम्हाला खूप आनंद देईल. पुण्य वाढेल. तसेच 15 तारखेपासून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा. मानसिकदृष्ट्या उत्साही राहा आणि कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा कारण सर्व कामे जलद मार्गी लावावी लागतील. कठीण कामं पूर्ण होतील. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यसन असेल तर आता त्यापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. कामातून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक काम प्लॅन करून पूर्ण करा. अनावश्यक धावपळीत अडकू नका.


आर्थिक आणि करिअर
एप्रिल महिन्यात तुम्हाला काही व्यवहार करावे लागतील. दुसऱ्यांच्या समस्येवर तोडगा कढण्याचा प्रयत्न करा. जे लोक बँकमध्ये काम करत आहेत त्यांनी ग्राहकाच्या सर्व सुविधांकडे विशेष लक्ष द्या. ऑफिसमध्ये काही मोठे प्रोजेक्टचे काम पूर्ण करावे लागेल. या वेळी अन्न धान्याच्या संबंधित व्यवसायात चांगला फायदा होईल.


आरोग्य 
खांद्या संबंधित आजार असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांनी डॉक्टरांसोबत संपर्क साधावा. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी देखील आरोग्याची विशेष काळजी घ्या.  कोलेस्टेरॉल किंवा थायरॉईडची समस्या असू शकते. जास्त काळजी करू नका. फक्त जास्त टेन्शन घेऊ नका कारण जास्त टेन्शन घेतल्याने तुमची तब्येत बिघडू शकते.  आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.


कुटुंब आणि समाज 


अतिशय मधुर आवाजात बोला कारण खूप कर्कश आवाजात बोलल्यास वाद होऊ शकतो. जर तुम्हाला घरात काही खरेदी करायची असेल आणि तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर तुम्ही ही वस्तू या नवरात्रीला घेऊ शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha