Ratha Saptami 2024 : हिंदू धर्मात रथ सप्तमीला (Ratha Saptami) विशेष महत्त्व आहे. यंदा रथ सप्तमी शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे, हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्म पुराणानुसार, या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथ सप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशीची सूर्याला अर्घ्य दिल्याने, सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात आणि आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात, अशी मान्यता आहे.
रथ सप्तमीच्या दिवशी इंद्र योगासह विविध योग बनत असल्याने या दिवसाला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. रथ सप्तमीच्या दिवशी काही राशींवर सूर्याची कृपा राहील, या राशींचे चांगले दिवस येण्यास सुरुवात होईल. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया. पण त्याआधी रथ सप्तमीचा मुहूर्त देखील पाहूया.
कधी आहे रथसप्तमी?
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला सकाळी 10.12 मिनिटांनी सुरू झाली आणि ती शुक्रवार, 16 फेब्रुवारीला सकाळी 8.54 मिनिटांनी समाप्त होईल. मात्र उदय तिथीनुसार, रथ सप्तमी 16 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. रथ सप्तमीच्या दिवश ब्रह्म योग, इंद्र योग आणि भरणी नक्षत्र आहे.
या राशींवर राहणार सूर्याची कृपा
मेष रास (Aries)
मेश राशीवर सूर्याची विशेष कृपा राहील. व्यवसाय क्षेत्रातील लोकांना व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी होईल. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.
मिथुन रास (Gemini)
सूर्याच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबासोबत धार्मिकस्थळी जाण्याचा योग निर्माण होईल. बहिण-भावांच्या नात्यात गोडवा टिकून राहील. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागेल. लव्ह लाईफमध्ये रोमान्स कायम राहील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीसाठी रथसप्तमीचा दिवस फलदायी ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्यांना सफलता मिळेल. नोकरी करत असलेल्यांना बढती मिळू शकते. मित्रासोबत तुम्ही एखादा नवा व्यवसाय सुरू करू शकता. लव्ह लाईपमध्ये असणारे तरुण/तरुणी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये प्रेमाचे रंग बहरतील.
सिंह रास (Leo)
सूर्यदेवाच्या कृपेने सिंह राशीचे लोक चांगला व्यवसाय चालवतील. तुमच्या व्यवसायात बरेच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील. या राशीचे तरुण अभ्यासासोबत धार्मिक कार्यात रस दाखवतील. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल, शिकवलेलं सर्व त्यांच्या लक्षात राहील.
मीन रास (Pisces)
रथ सप्तमी मीन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. नोकरी-व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना एखाद्या चांगल्या ठिकाणी पोस्टींग मिळू शकते. जोडीदारासोबत तुम्ही एखाद्या फॅमिली फंक्शनला उपस्थित राहाल, तुमची कौटुंबिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :