Raksha Bandhan 2025 Wishes : भारतीय संस्कृतीत नात्यांना मोठं स्थान देण्यात आलं आहे. त्यातही भावा-बहिणीचं नातं फार अतूट मानलं जातं. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन (Raksha Bandhan). या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या निरोगी आयुष्यासाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करते. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. सण म्हटला की शुभेच्छा देणं आलंच. अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ते तुम्ही तुमच्या भावंडांना पाठवू शकता आणि सणाचा आनंद अधिक वाढवू शकता.
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश 2025 (Raksha Bandhan Wishes 2025)
बंध हा प्रेमाचा,नाव ज्याचे राखी,बांधिते भाऊराया आज तुझ्या हातीराखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कुठल्याच नात्यात नसेलएवढी ओढ आहे,म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,खूप खूप गोड आहे…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू देभाऊ माझा यशाने न्हाऊ दे...राखीशिवाय काही नाही माझ्याकडेम्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे...राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हे बंध स्नेहाचे,हे बंध रक्षणाचे,रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनबहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सणरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एक धागा, एक विश्वास,हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खासरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊ आणि बहिणीच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असणाऱ्यारक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनघेऊन आला हा श्रावणरक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा!
बहिणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं,निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं…सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल,नातं असं हे आपुलकीचं...भाऊ बहिणीच्या प्रेमाचं…रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
नातं बहीण-भावाचं म्हणजे टॉम अँड जेरीजेवढा राग, तेवढंच प्रेम हे म्हणजे लय भारीरक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
भाऊ लहान असो वा मोठा,बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थाननेहमीच अढळ आणि मोठंच असतंरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे,मी कधीच कशाला घाबरत नाही कारणमाझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे!रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे,कारण तो तुमच्यावर वडिलकीच्या नात्याने धाक तर दाखवतोच,पण वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षणही करतो!रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
मला सुपरहिरोची काहीच गरज नाहीकारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहेरक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
हे ही वाचा :