Rajyog 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेत संक्रमण करतात. ग्रहांचं संक्रमण करताना अनेक शुभ आणि राजयोग (Rajyog) निर्माण होतात. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. सध्या न्यायदेवता शनी आपल्या कुंभ राशीत आहे. तर, 19 मे रोजी गुरू ग्रह शुक्रसुद्धा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याच कारणामुळे तब्बल 30 वर्षांनंतर शश आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे शुभ योग 4 राशींसाठी (Horoscope) फार शुभ ठरणार आहेत.
'या' राशींना मिळणार राजयोगाचा लाभ
वृषभ रास
ज्योतिष शास्त्रानुसार, शश आणि मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी फारच लकी ठरणार आहे. या दरम्यान व्यावसायिकांना चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, तुम्ही करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णयसुद्धा या कालावधीत घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारात वाढदेखील होईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग फार शुभ ठरणार आहे.
नोकरीसाठी तुम्हाला नवीन संधी तर मिळेलच पण त्याचबरोबर तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
कुंभ रास
तब्बल 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, या दरम्यान शश राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लकी ठरणार आहे. या दरम्यान 2025 पर्यंत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदार लोकांना प्रमोश आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतायत त्यांना चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
मकर रास
शश आणि मालव्य राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत. या दरम्यान तुम्ही जे काही शुभ काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशी देखील जाण्याची संधी मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानल धनलाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :