Rahu Shani Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना कर्माची देवता मानले जाते. जे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. 2025 वर्षाबद्दल बोलायचं झालं तर, हे वर्ष ज्योतिषीय दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे. कारण या वर्षात अनेक ग्रह-ताऱ्यांचे संक्रमण होत आहे, अशात या वर्षातील मोठं संक्रमण म्हणजे 29 मार्च 2025 रोजी, नुकतंच कर्माचा स्वामी आणि न्यायाधीश शनि मीन राशीत संक्रमण केलंय, त्यामुळे शनिचा आधीच तिथे असलेल्या राहूशी युती झाली. शनि आणि राहूच्या या युतीमुळे पिशाच योग निर्माण झाला, जो अशुभ मानला जातो. या दोन्ही ग्रहांची हा युती आणि योग 18 मे 2025 पासून भंग होत आहे. याचे कारण म्हणजे राहू आपली राशी बदलत आहे आणि तो 18 मे रोजी संध्याकाळी 4:30 वाजता मीन राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. जाणून घ्या..
राहू-शनीची युती तुटणार, 3 राशी होणार धनवान..!
तसं पाहायला गेलं तर ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि राहू या दोन्ही ग्रहांची युती आणि योग 18 मे 2025 पासून भंग होत आहे. तसेच राहूने आपली राशी बदलल्यानंतरही, या मायावी ग्रहाला शनीचा आधार मिळत राहील, कारण कुंभ ही शनिदेवाची मूळ त्रिकोण राशी आहे. या राशीत राहूच्या उपस्थितीमुळे राहू शक्तिशाली बनतो आणि पिशाच योग विलीन होतो. या योगाच्या खंडनाचा, तसेच राहूच्या कुंभ राशीतील संक्रमणाचा परिणाम सर्व राशींवर व्यापक आणि खोलवर असेल, परंतु यामुळे 3 राशींचे भाग्य उजळू शकते. त्यांच्या कारकिर्दीत, व्यवसायात आणि कामात प्रगती होईल; आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहील. परंतु असे असूनही, राहूला कर्माचा स्वामी शनीचा पाठिंबा मिळत राहील. यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. जाणून घेऊया, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू-शनि युती तुटल्याचा वृषभ राशीला फायदा होईल, करिअरमध्ये तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर परदेशी संबंधांचा तुम्हाला फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ पैसा आणि करिअरमध्ये प्रगतीचा आहे. यावेळी, तुम्हाला पैशाच्या बाबतीत मोठे फायदे मिळतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि नोकरी किंवा व्यवसायात वाढ होण्याची संधी मिळेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील, जुन्या आजारांपासून आराम मिळेल. लपलेल्या शत्रूपासून सावध रहा, परंतु ग्रह तुमच्या बाजूने असल्याने घाबरू नका.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांमध्ये या काळात चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, जे त्यांच्या आयुष्यातही दिसून येईल. नवीन संधी उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. नात्यात गोडवा वाढेल, लग्नाचा प्रस्तावही येऊ शकतो. तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा आणि घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. पिशाच योगातून मुक्त झाल्यानंतर, राहूच्या प्रभावामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणारे अडथळे दूर होतील. स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ चांगला आहे. नोकरीत स्थिरता राहील. सरकारी कामात यश मिळेल.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीतील राहूचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, हा तुमच्या ताकदीचा आणि यशाचा काळ ठरेल. आत्मविश्वास बाळगा, पण जास्त आत्मविश्वास दाखवू नका, तरच सर्व काम योग्यरित्या पूर्ण होईल. कारण शनीचा शुभ प्रभाव राहूवर राहील. शनि आणि राहूची ही स्थिती तुमची निर्णय क्षमता मजबूत करेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित कामात नफा होईल. तुम्हाला दीर्घकालीन फायदे मिळतील. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल, नवीन योजना यशस्वी होतील.
हेही वाचा :
June 2025 Astrology: खूप सोसलं, जूनमध्ये 'या' 3 राशींनी टेन्शन सोडा! शुक्र राशी बदलणार, अमाप संपत्तीचे धनी व्हाल, कुबेराचा खजिना उघडणार?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)