Rahu Nakshatra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मायावी ग्रह राहु (Rahu) आणि न्यायाचा देवता शनी हे दोन ग्रह फार महत्त्वाचे मानले जातात. शनी (Shani Dev) आणि राहु हे मित्र ग्रहसुद्धा आहेत. लवकरच शनी (Lord Shani) आणि राहुची एक स्थिती निर्माण होणार आहे. अर्थात, 8 जुलै रोजी राहु नक्षत्र परिवर्तन करून उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी शनी हे. अशातच राहु आणि मित्र ग्रह शनी यांच्या एकत्र संयोगाने शुभ योग जुळून येणार आहे.
राहुचं नक्षत्र संक्रमण 5 राशींच्या लोकांसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ, राजवैभवसह अनेक गोष्टींत चांगलंच यश मिळणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी राहु ग्रहाचं हे नक्षत्र परिवर्तन फार दिलासादायक असणार आहे.या काळात तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला सुटका मिळेल. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच जे नोकरदार वर्गातील लोक आहेत त्यांना प्रमोशन मिळण्याची संधी आहे. या कालावधीत तुम्ही एखादी प्रॉपर्टी किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. राजकारणात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
राहु ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी जुन्या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही आखलेल्या योजना सफल होतील. वैवाहिक जीवन सुखी असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
राहु काळ सिंह राशीच्या लोकांसाठी फार चांगला ठरणार आहे. या कालावधीत व्यावसायिक लोकांना या काळात चांगला नफा मिळणार आहे. तुम्हाला जर तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
राहुचं नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. या कालावधीत तुम्हाला एकामागून धनलाभ होण्याची संधी मिळेल. तसेच, बेरोजगार लोकांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. तुमची लोकप्रियता अधिक वाढेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे . तर, राहु शनीचा मित्र ग्रह आहे. त्यामुळे राहु शनीच्याच नक्षत्रात संक्रमण करणार आहे. हा बदल मकर राशीच्या लोकांसाठी फार भाग्याचा असणार आहे. करिअरशी संबंधित निर्णय तुम्ही घेऊ शकता. तसेच, बॉसबरोबर तुमचा व्यहार चांगला असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :