Rahu Ketu Dosh : ज्योतिषशास्त्रात (Astrology) राहुला अशुभ ग्रह मानले जाते तसेच राहूला छाया ग्रह म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, राहूला पापी ग्रह म्हटले आहे. साधारणपणे कुंडलीत राहूचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. कोणताही ग्रह शुभ किंवा अशुभ नसला तरी त्याचे परिणाम शुभ किंवा अशुभ असतात. राहूचा कोणत्याही राशीवर मालकी हक्क नाही.
पत्रिकेत राहु दोष असेल तर...
तुमच्या पत्रिकेत राहू जेव्हा कमकुवत स्थितीत असतो तेव्हा त्याचे परिणाम नकारात्मक असतात. कुंडलीत राहु दोष असेल तर व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य समस्यांनी घेरलेले असते. त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सुचवले आहेत ज्यांचा उपयोग ग्रहांना शांत करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी केला जातो. राहू दोष दूर करण्याचे सोपे उपाय जाणून घेऊया.
राहू दोषावर उपाय
जर पत्रिकेत राहूची स्थिती खूप वाईट असेल किंवा राहु दोष असेल तर तो दूर करण्यासाठी पोळीचा उपाय खूप प्रभावी ठरतो.
ताज्या किंवा शिळ्या पोळीवर मोहरीचे तेल लावा आणि काळ्या कुत्र्याला खायला द्या. असे मानले जाते की असे सतत 15 दिवस केल्याने राहू दोष दूर होतो.
अमावस्येच्या दिवशी कावळ्याला भाकरी दिल्याने राहूची बिघडलेली स्थिती सुधारू लागते.
भाकरीमध्ये साखर घालून मुंग्यांना खाऊ घातल्यास कमकुवत राहू बलवान होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहुचा अशुभ प्रभाव आहे त्यांनी यापासून वाचण्यासाठी शनिदेव आणि भगवान भैरवाची पूजा करावी.
हनुमान चालिसाचा पाठ केल्याने राहूचा प्रभाव दूर होतो.
गरजू लोकांना काळे ब्लँकेट, बूट आणि चप्पल दान करा. मंदिरात पूजा साहित्य अर्पण करावे.
राहूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी दुर्गा मातेची पूजा करावी.
नागावर नाचताना भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने राहुचा अशुभ प्रभाव कमी होतो.
घरात अनेकदा कलहाचे किंवा भांडणाचे वातावरण असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी स्वयंपाक करताना कुत्र्यासाठी पहिली पोळी बाजूला काढा.
असे केल्याने कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
गाईच्या नावाने पहिली पोळी काढून खाऊ घालावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. सर्व प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.
रत्नशास्त्रात, गोमेदचा उल्लेख राहूसाठी रत्न म्हणून केला जातो. हे रत्न धारण केल्याने राहू दोषापासून लवकर आराम मिळतो आणि खूप चांगले फळ मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Diwali 2023 : धनत्रयोदशीला 5 महासंयोग! दिवाळीत 14 शुभ योग बनणार, कोणत्या योगात काय खरेदी कराल? जाणून घ्या