Rahu 2024 : राहू 2024 मध्ये मीन राशीत असेल आणि 2025 पर्यंत तो या राशीतच राहील. वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू (Rahu) हा पापी आणि क्रूर ग्रह मानला जातो. राहूची महादशा 18 वर्षं टिकते, अशा स्थितीत राहू जर कुंडलीत शुभ स्थानी असेल तर तो व्यक्तीला शुभ फल देतो. हेच जर कुंडलीत राहू अशुभ स्थानी असेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.


2024 मधील मीन राशीतील राहूचं मार्गक्रमण काही राशींसाठी अडचणी निर्माण करू शकतं, या राशीच्या लोकांना 2024 मध्ये अत्यंत सावध आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या लोकांना 2024 मध्ये राहूमुळे काळजी घ्यावी लागणार? जाणून घेऊया.


कन्या रास (Virgo)


2024 मध्ये कन्या राशीच्या लोकांनी अत्यंत सावधगिरीने वागणं आवश्यक आहे. राहू तुमच्या राशीतून सप्तम भावात प्रवेश करत आहे, अशा स्थितीत तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्ही तुमचं काम अत्यंत सावधगिरीने करणं आवश्यक आहे, अन्यथा तुमच्या कामात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात. कन्या राशीच्या लोकांना लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही.


धनु रास (Sagittarius)


राहू तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश करत आहे, त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नये. तसेच, 2024 मध्ये तुमच्या सुखसोयी कमी होऊ शकतात, तुमचे खर्च वाढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. घरात मालमत्तेबाबत मोठा वाद निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागू शकतं.


कुंभ रास (Aquarius)


राहू तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात आहे, ज्यामुळे तुम्हाला 2024 मध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमचे खर्च अचानक वाढू शकतात, जे हाताळणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. 2024 मध्ये प्रवास करताना तुम्ही काळजी घ्यावी. नोकरदार लोकांनी आपलं काम काळजीपूर्वक करावं आणि अधिकारी, सहकाऱ्यांशी वाद घालू नये. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आणि पैशाचे व्यवहार टाळा.


मीन (Pisces)


राहू 2024 मध्ये तुमच्या राशीत राहणार आहे. या काळात मीन राशीच्या लोकांनी आपलं काम विचारपूर्वक करावं आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावं. कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात आणि रागात केलेलं काम बिघडू शकतं. या राशीच्या व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते चिंतेत राहतील. मीन राशीच्या लोकांना या वर्षात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जीवनातील अति अहंकारामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण नकारात्मक राहू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांनी 2024 मध्ये सावधगिरीने काम करावं, अन्यथा तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani : 12 दिवसांनंतर शनि माजवणार कहर; 'या' राशींनी राहावं जपून, होणार आर्थिक नुकसान, कामं रखडणार