Shani Asta 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी शनिदेव राशी परिवर्तन करणार नाही. 2024 मध्ये शनि आपल्या मूळ राशीत, म्हणजेच कुंभ राशीतच विराजमान असणार आहे. परंतु कुंभ राशीतच शनि अधूनमधून आपल्या हालचालीत बदल करेल.


शनि 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होईल. शनीच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर काही राशीच्या जीवनात समस्या उद्भवू शकतात. 11 मार्चला शनीचा अस्त झाल्यावर 26 मार्चला सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा शनीचा कुंभ राशीत उदय होईल.


दरम्यान, शनीच्या अस्तामुळे काही राशींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शनीच्या (Shani) अस्तामुळे कोणत्या राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, मेष राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो . या राशीत शनि अकराव्या भावात अस्त होईल, त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात अनेक प्रकारची आव्हानं उभी राहू शकतात. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या कामात समाधानी दिसणार नाही. यासोबतच व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोललं तर, व्यवसायात काही समस्या उद्भवू शकतात. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देताना दिसाल, पण याचे संमिश्र परिणाम होणार आहेत. यासोबतच घरी तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात.


कन्या रास (Virgo)


या राशीमध्ये शनि सहाव्या भावात अस्त होत आहे. या काळात कन्या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात थोडं सावध राहणं आवश्यक आहे. तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. नोकरदारांना थोड्या कामासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरीत तुम्हाला थोडं दडपण जाणवेल. यासोबतच जीवनात काही अडथळे येऊ शकतात. जर आपण व्यवसाय क्षेत्राबद्दल बोललो तर, व्यावसायिकांना नफा मिळणं कठीण होईल. संयमाने काम केलं तरच लाभ मिळेल. कुटुंबात काही कारणावरून वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो.


वृषभ रास (Taurus)


कुंभ राशीतील शनीच्या अस्तामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात चढ-उतार येतील. शनि हा वृषभ राशीच्या दहाव्या भावात स्थित होईल, त्यामुळे या काळात नोकरीत चढ-उतार असू शकतात. तथापि, नवीन संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. करिअरबाबत तुम्ही थोडे चिंतेत राहाल. सहकारी तुमचा विरोध करतील, त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच व्यवसायाबाबतही थोडं सावध राहण्याची गरज आहे. बाजारात प्रतिस्पर्ध्यांसोबत कठीण स्पर्धा होऊ शकते, त्यामुळे व्यवसायासाठी योग्य रणनीती बनवणं महत्त्वाचं आहे. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Positive Impact : 11 फेब्रुवारीला शनि होणार अस्त; 'या' राशींना येणार चांगले दिवस, मिळणार पुरेपूर लाभ