Rahu Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहु ग्रहाला मायावी ग्रह म्हणतात. राहुला कठोर वाणी, यात्रा, चोरी, दुष्ट कर्म, त्वचेचा रोग यांचा कारक मानला जातो. याचाच अर्थ जेव्हा राहुच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा वरील गोष्टींवर वाईट परिणाम होतो. माहितीसाठी, राहु ग्रह 2025 मध्ये राशी परिवर्तन करणार आहे. राहु (Rahu) कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचे अच्छे दिन लवकरच सुरु होऊ शकतात. तर काही राशींना अचानक धनलाभही होऊ शकतो. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी राहुचं संक्रमण लाभदायक ठरु शकते. कारण राहु या राशीच्या लग्न भावात आहे. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये देखील चांगला बदल पाहायला मिळेल. तुमच्या नोकरीत चांगली स्थिरता राहील. जे वैवाहिक लोक आहेत त्यांचं आयुष्य सुरळीत चालेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
राहु ग्रहाचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभकारक ठरणार आहे. कारण या राशीच्या कर्म भावात राहु ग्रह संक्रमण करतोय. त्यामुळे तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी राहुचं संक्रमण फार लाभदायक ठरु शकतं. कारण या राशीच्या भाग्याच्या स्थानी राहु ग्रह संक्रमण करतोय. यामुळे तुम्हाला या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. या काळात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. तसेच, धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होताना दिसाल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: