Rahu Gochar 2026 : वैदिक पंचांगानुसार, नवीन वर्ष 2026 मध्ये अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण आणि राशी परिवर्तन होणार आहे. यामध्ये पापी ग्रह राहूचा (Rahu Gochar) सुद्धा समावेश आहे. माहितीनुसार, नवीन वर्षात राहूचं दोनदा संक्रमण होणार आहे. यावेळी 5 डिसेंबर 2026 रोजी कुंभ राशीतून मकर राशीत संक्रमण होईल तर 2 ऑगस्ट रोजी राहूचं धनिष्ठा नक्षत्रात परिवर्तन होणार आहे. यामुळे राहूच्या डबल संक्रमणामुळे अनेक राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या ते पाहूयात. 

Continues below advertisement

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी राहूचं डबल संक्रमण लाभदायी ठरेल. वर्षाच्या शेवटी राहू ग्रह बाराव्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होईल. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळेल. भविष्यासाठी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

राहू ग्रहाच्या संक्रमणाने मिथुन राशींसाठी हा काळ फलदायी ठरेल.  कारण राहू ग्रह या राशीच्या नवव्या चरणात संक्रमण करणार आहे. तर, वर्षाच्या शेवटी अष्टम भावात संक्रमण करेल. त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. व्यवसायिकांना चांगला धनलाभ मिळेल. या काळात तुमच्या भौतिक सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. 

Continues below advertisement

तूळ रास (Libra Horoscope)

राहूचं डबल राशी परिवर्तन तूळ राशीसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात पंचम चरणात राहू संक्रमण करे. तर, 2026 वर्षाच्या शेवटी चतुर्थ भावात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्ही वाह किंवा प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. समाजात तुमचं कौतुक होईल. यात्रेचा शुभ योग जुळून येतोय. त्यामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कलागुणांचा विकास होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :         

December Grah Gochar 2025 : डिसेंबर महिन्यात 5 मोठ्ठ्या ग्रहांचं महासंक्रमण; मेष, धनुसह 'या' राशींना लागणार लॉटरी, हातात येणार पैसाच पैसा