Rahu Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, पापी ग्रह राहू (Rahu) तब्बल 18 वर्षांनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. माहितीनुसार, राहू आणि केतू नेहमी उलट्या चालीने गती करतात. 2026 मध्ये राहू ग्रह कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरु होतील. यामध्ये काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी राहू ग्रहाचं राशी परिवर्तन अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या धन आणि वाणीच्या स्थानी राहू ग्रह वक्री होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी धनलाभाचे संकेत मिळू शकतात. तुम्ही तुमची रखडलेली कामे देखील या काळात करु शकता. तसेच, सामाजिक प्रतिष्ठेत तुमची वाढ झालेली दिसेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. बुद्धीचा विकास चांगला होईल. तसेच, समाजात मान मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

राहू ग्रहाच्या उलट्या चालीचा लाभ वृषभ राशीला देखील मिळणार आहे. राहू ग्रह या राशीच्या अकराव्या स्थानी उलटी चाल चालणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. व्यवसायाचा विस्तार झालेला दिसेल. तसेच, या काळात तुमच्या पदोन्नतीत वाढ झालेली दिसेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

राहू ग्रहाच्या उलट्या चालीचा लाभ मिथुन राशीला देखील होणार आहे. या काळात राहू ग्रह कुमच्या कुंडलीतील कर्म स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्या कामकाजात चांगली प्रगती झालेली दिसेल. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. तसेच, उत्पन्नाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. लवकरच तुम्हाला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. 

हे ही वाचा :                                                               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Monthly Horoscope December 2025 : वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना 4 राशींचं भाग्य घेऊन येणार; कुंभसह 'या' राशींचं बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, राजासारखं आयुष्य जगाल