Continues below advertisement

Rahu Gochar 2025 : हिंदू द्रिक पंचांगानुसार, येत्या 23 नोव्हेंबरला (November 2025) म्हणजेच उद्या रविवारच्या दिवशी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी राहू ग्रह (Rahu Gochar) शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पूर्व भाद्रपद नक्षत्रातून शतभिषा नक्षत्रापर्यंत राहूचं संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी विशेष लाभदायी ठरु शकतं. राहू ग्रह याच नक्षत्रात पुढच्या 9 महिन्यापर्यंत म्हणजेच पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत येथेच स्थित असणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी ग्रह राहूच आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, या दरम्यान या काळात केलेले नवीन कार्य आणि गुंतवणुकीतून शुभ परिणाम मिळतात. राहू ग्रहाची स्थिती मानसिक सतर्कता आणि धैर्य वाढवण्यास मदत करते. त्यामुळे ज्या लोकांना आपल्या करिअरमध्ये, शिक्षणात आणि व्यवसायात प्रगती पाहायची असेल तर त्यासाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

राहूचं शतभिषा नक्षत्रात होणाऱ्या संक्रमणामुळे मेष राशीच्या करिअर आणि आर्थिक स्थितीत सुधारणा पाहायला मिळेल. या कालावधीत काही नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागू शकतात. त्यामुळे धैर्य आणि सतर्कतेने काम करा. जुने वादविवाद मिटतील.

कर्क रास (Cancer Horoscope)

राहूच्या संक्रमणाने कर्क राशीसाठी देखील हा काळ भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. करिअरमध्ये अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

राहूच्या संक्रमणाने वृश्चिक राशीचे लोक फार आनंदात जगतील. या काळात तुमच्या प्रगतीत चांगली वाढ झालेली दिसेल. जुने वादविवाद मिटतील. तसेच, पैशांच्या गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार आहे. नवीन लोकांशी गाठीभेटी होतील. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीला यश येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :         

Weekly Horoscope : तूळ ते मीन राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजर; हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य