Rahu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, राहु (Rahu) सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक आहे, त्याला छायाग्रह असंही म्हणतात. राहू हा वाईट संगती, क्रोध, धूर्तपणा, क्रूरता, लोभ इत्यादीला कारणीभूत मानला जातो. राहूच्या राशी बदलामुळे लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण होते. राहू एका राशीत सुमारे 18 महिने राहतो. जर तुमच्या कुंडलीत राहूची स्थिती चांगली असेल तरच ती व्यक्ती आकाशात उंच झेप घेऊ शकते. 


सध्या राहू उत्तराभाद्रपद नक्षत्रात आहे आणि 2 डिसेंबरपर्यंत तो या नक्षत्रात राहील. या नक्षत्राचा स्वामी शनि आहे. शनीची राहुशी मैत्रीची भावना आहे, त्यामुळे या काळात काही राशींना शुभ परिणाम मिळू शकतात. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


कुंभ रास (Aquarius)


शनीच्या नक्षत्रात राहूची उपस्थिती कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. 2025 पर्यंत या राशीच्या लोकांना दुहेरी लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्यासोबतच संपत्तीतही वाढ होऊ शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळी जाता येईल. भौतिक सुखात वाढ होईल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणी संपुष्टात येतील. तुम्हाला आता कोर्ट केसेसमध्ये फायदा मिळू शकेल. जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो.


वृषभ रास (Taurus)


राहू नक्षत्र परिवर्तन काळात वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशाची चांगली संधी मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरदार लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासह, आपण आपल्या जीवनात समाधानी असल्याचं दिसेल. तुम्ही शेअर मार्केटमधून चांगले पैसे कमवू शकता. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. 


कन्या रास (Virgo)


राहुचा नक्षत्र बदल कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुरु असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या अहंकारामुळे बिघडलेल्या गोष्टी आता सुधरू शकतात. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला नोकरीत अनेक संधी मिळू शकतात. यासोबतच प्रमोशनसोबत पगार वाढू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani 2024 : शनीवर पडणार सूर्याची शुभ दृष्टी; 16 सप्टेंबरपासून 'या' राशींचे अच्छे दिन सुरू, उत्पन्नाचे अनपेक्षित स्रोत होणार खुले