Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात मंगळ (Mars) ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा मंगळ राशी परिवर्तन (Mars Transit 2024) करतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर पडतो. मंगळ ऑक्टोबरमध्ये कर्क (Cancer) राशीत प्रवेश करणार आहे, जी मंगळाची सर्वात खालची राशी मानली जाते. येथे मंगळ नीचभंग राजयोग तयार होणार आहे, यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच या लोकांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. मंगळाच्या मार्गक्रमणामुळे कोणत्या राशींचं (Zodiac Signs) नशीब उजळणार? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीत मंगळाचा प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. यासोबतच समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. गेल्या एक वर्षापासून तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुमची कार्यशैली सुधारेल. तसेच जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते.
कन्या रास (Virgo)
मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण मंगळ तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. या काळात जे लोक निर्यात आणि आयात व्यवसायात आहेत त्यांना फायदा होऊ शकतो.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. याशिवाय, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही तुम्हाला तुमचे वडील आणि शिक्षकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. यावेळी, कौटुंबिक जीवन खूप आश्चर्यकारक आणि आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. तसेच ज्या लोकांचे प्रेम संबंध आहेत त्यांना यावेळी यश मिळू शकतं. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :