Angarak Yog In Meen : ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. अशा स्थितीत दोन ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. ग्रहांच्या स्थितीनुसार, नवीन वर्ष खूप खास मानले जाते. नवीन वर्षात, म्हणजेच 2024 मध्ये देखील अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षात राहू मीन राशीत राहणार असून त्याचा अनेक ग्रहांशी संयोग होईल. एप्रिलमध्ये राहुची युती मंगळ ग्रहासोबत होणार असल्याने अंगारक नावाचा अशुभ योग तयार होत आहे. 23 एप्रिल 2024 रोजी मंगळ देखील या राशीत प्रवेश करणार असून अंगारक योग तयार होईल. मंगळ आणि राहूच्या संयोगाने तयार होत असलेला अंगारक योग काही राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो.
मेष रास (Aries)
या राशीमध्ये मंगळ आणि राहूचा संयोग बाराव्या घरात होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी फारसा लाभदायक ठरणार नाही. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कालांतराने तुमच्या विचारांमध्ये बदल दिसतील. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याबाबतही थोडे सावध राहण्याची गरज आहे. काही कामे अचानक थांबू शकतात. त्यामुळे थोडे सावध राहण्याची गरज आहे.
सिंह रास (Leo)
या राशीमध्ये आठव्या घरात अंगारक योग तयार होणार आहे. नोकरदार लोकांना दबावाचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. यासोबतच कायदेशीर वादांपासून दूर राहा, कारण त्याचा तुमचा वेळ, उत्पन्न आणि व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पैशाबाबत कोणताही निर्णय हुशारीने घ्या, जेणेकरून तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागणार नाही. कोणाशीही विनाकारण वाद घालणे टाळा.
कुंभ रास (Aquarius)
या राशीच्या दुसऱ्या घरात अंगारक योग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकणार आहे. प्रत्येक काम अत्यंत काळजीपूर्वक करा, जेणेकरून नंतर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. वाहन चालवताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: