Puja Tips : जवळपास प्रत्येक पूजेमध्ये अगरबत्ती, उदबत्ती आणि धूप जाळला जातो. पूजा मंदिरात (Temple) असो वा घरात प्रत्येक पूजेच्या वेळी अगरबत्ती लावतातच. अनेकांना तर, धूप आणि उदबत्तीशिवाय पूजा अपूर्णच वाटते. अगदी घरातील प्रवेश, उद्घाटनासारख्या शुभ प्रसंगी देखील अगरबत्ती आणि धूपचा वापर केला जातो. मंदिरात देवासमोर जसा दिवा प्रज्वलित केला जातो तसेच अगरबत्ती आणि धूपसुद्धा लावण्यात येतो. पण, पूजेच्या वेळी अगरबत्ती, धूप का लावला जातो यामागच कारण तुम्हाला माहीत आहे का? 


1. उदबत्ती आणि अगरबत्तीच्या सुगंधाने वातावरणात एक प्रकारे सकारात्मकता येते. यामुळे पूजेदरम्यान वातावरण सुगंधित राहते. वातावरणातून नकारात्मकता दूर व्हावी आणि सकारात्मकता त्याच्या जागी यावी. उदबत्तींनी पसरलेला सुगंध मनाला शांती देतो आणि एखाद्याला खूप छान वाटतो. यामुळे व्यक्तीच्या मनात शुद्धता आणि शांती देखील येते. या कारणामुळे, अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि फुलांचे अर्क धूप आणि अगरबत्ती बनवण्यासाठी वापरले जातात. तसेच, कापूरचा देखील वापर केला जातो. यामुळे अनेक दोष दूर होतात. 


2. मंदिरात भक्त जेव्हा देवाच्या भेटीसाठी जातात. तेव्हा तेथील सुगंधित वातावरणामुळे शुद्ध, सुखद आणि सुगंधी असा अनुभव येतो. मन स्थिर होतं. यामुळे मंदिरात अगरबत्ती जाळण्यात येते.  


3. अगरबत्ती हळूहळू जळते आणि वातावारण सुगंधित करते. प्रभू सन्मुख स्वत:च्या शरीराला जाळतात आणि अगरबत्तीची राख शरीराला घासण्याची, विरघळण्याची आणि प्रभू कार्यासाठी वातावरण सुगंधित करण्याची प्रेरणा देते. भगवंताच्या दर्शनावेळी अशी प्रेरणा सतत मिळावी म्हणून मंदिरात अगरबत्ती पेटवली जाते. 


4. यामध्ये अंतराच्या सखोल अन्वेषाचा प्रतिध्वनी देखील असू शकतो. ज्याच्याशी मंदिरात निर्माण होणारे आवाज संबंधित होते. ओंकाराचा जप करताना किंवा वेदमंत्रांचा जप करताना जाणवणारा विशिष्ट सुगंधाच अनुभूती होते. त्यावेळी जाणवणारा सुगंध हा उदबत्तीच्या सुगंधासारखाच असतो. अशा प्रकारे उदबत्तीचा सुगंध हा भक्ताच्या दूरवर अनुभवलेल्या गंधाला बाजारात मिळणारा समांतर सुगंध आहे. या गंधातून निघणारी अगरबत्ती मंदिरात येणाऱ्या भक्ताला साधनेत सहभागी होण्यासाठी परमेश्वरासमोर प्रज्वलित केली जाते. 


अशा प्रकारे संबंधित सुगंधांचा उपयोग मंदिरातील वातावरण चार्ज, उत्साहित, प्रफुल्लित करण्यासाठी केला जातो. म्हणूनच मंदिरात अगरबत्ती -उदबत्ती जाळल्या जातात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 2038 पर्यंत 'या' राशींवर असणार शनिची साडेसाती; एकामागोमाग करावा लागणार संकटांचा सामना