Premanand Maharaj : प्रेमानंद महारांजांची (Premanand Maharaj) ख्याती संपूर्ण देशभरात आहे. अनेक भक्त, सेलिब्रिटी त्यांच्या विचारांचं पालन करतात. प्रेमानंद महाराजांच्या शिकवणुनीने समाजात जागरुकता पसरते अशी मान्यता आहे. प्रेमानंद महाराजांच्या शिकवणीने फक्त व्यक्तित्वच सुधारत नाही तर सुखद जीवनाचा देखील अनुभव मिळतो. प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्त वृंदावनमध्ये येतात.
प्रेमानंद महाराज वृंदावन येथे सत्संग करतात. त्यांचं सत्संग, त्यांचे विचार ऐकण्यासाठी जगभरातून भक्त या ठिकाणी जमतात. या दरम्यान अनेक सेलिब्रिटी, क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. या दरम्यान भक्त त्यांना काही प्रश्न विचारतात. ज्याचं ते आपल्या सत्संगातून उत्तर देतात.
नुकताच एका भक्ताने प्रेमानंद महाराज यांना घरात श्वान पाळावा की पाळू नये? असा प्रश्न विचारला. यावर प्रेमानंद महाराजांनी जे उत्तर दिलं आहे त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तर, भक्ताच्या प्रश्नाला प्रेमानंद महाराजांनी नेमकं काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.
घरात श्वान पाळावा की पाळू नये?
भक्ताच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, जर तुम्ही घरी श्वान पाळत असाल तर तुम्ही त्याचे लाड पुरवतात, त्याच्यावर प्रेम करतात जे अत्यंत साहजिक आहे. कारण मनुष्य असो वा प्राणी सर्व जीवांची निर्मिती ईश्वर करतात. त्यामुळेच सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे. तसेच, सर्वांना प्रेम मिळालं पाहिजे. पण, हे त्या स्थितीनुसार असलं पाहिजे. तुम्ही श्वानाला भोजन देऊ शकता. ते आजारी असल्यावर त्याची काळजी घ्या. त्याला औषधपाणी द्या. मात्र, श्वानाला किचनमध्ये आणू नका, त्याच्याबरोबर झोपू नका. मान्यतेनुसार, श्वानाला रक्षणकर्ता म्हणून ओळखतात. तो आपल्या घराचं रक्षण करतो. त्यामुळे श्वानाला घराच्या दारापाशीच पाळणं गरजेचं आहे. कारण, शास्त्रात तसा उल्लेख केला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :