Navpancham Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल ठराविक वेळेच्या अंतराने बदलते. यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून येतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर होतो. तसेच, येत्या काही दिवसांत म्हणजेच 28 जून रोजी बुध ग्रह आणि शनी देव एकत्र मिळून नवपंचम राजयोग निर्माण करणार आहेत. यामुळे शुभ राजयोग निर्माण होईल. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या 120 डिग्री अंशावर असणार आहेत. ग्रहांच्या या चालीमुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फार लाभदायी ठरेल. या काळात जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. तसेच, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल. या काळात इतरांशी व्यवहार करताना प्रामाणिकपणाने करा. गैरवर्तन करु नका. तसेच, मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी नवपंचम योग फार चांगला ठरणार आहे. या काळात तुमच्या नावाचं कौतुक होईल. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला परदेशी प्रवास करण्याचे देखील योग जुळून येणार आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. तुम्ही आखलेल्या योजना आमलात येतील. धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. अशा वेळी घराजवळच्या मंदिराला भेट द्या. तुमचं मन प्रसन्न राहील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या पदोन्नतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. हाती घेतलेलं कार्य पूर्ण होईल. विशेष म्हणजे, शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल. पैशांची बरकत होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :   

Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' 5 राशींच्या पाठीशी असणार गणराया, संपत्तीत भरभराट