Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. प्रदोष व्रत (Pradosh Vrat) प्रत्येक त्रयोदशी तिथीला पाळले जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रत पाळल्याने जीवनात समृद्धी आणि समृद्धी येते.यंदा होळीच्या अगोदर भगवान शंकराला प्रसन्न करण्याची संधी आहे. या दिवशी भगवान भोलेनाथची पूजा करून तुमच्या मनोकामना पूर्ण होतात या महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत होळीच्या आधी साजरे जाणार आहे. मात्र प्रदोषचे व्रत कधी करावे 22 की 23 मार्च याविषयी अनेकांच्य मनात संभ्रम आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 22 मार्च रोजी पहाटे 4:44 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 23 मार्च रोजी सकाळी 7 :17 वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे, उदय तिथीनुसार, फाल्गुन महिन्याचे शुक्र प्रदोष व्रत आणि मार्च महिन्याचे व्रत 22 मार्च शुक्रवारी पाळले जाईल. या दिवशी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर भगवान शंकराची उपासना केल्यास खूप शुभ फळ प्राप्त होते. यासाठी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:34 ते रात्री 8:55 पर्यंत असेल.
प्रदोष व्रताचे महत्त्व
प्रदोष व्रतात भगवान भोलेनाथांची पूजा करावी. या दिवशी सकाळी स्नान करून भगवान भोलेनाथाची पूजा करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. यानंतर संध्याकाळी बेलपत्र, धोतऱ्याचे फुल आणि भस्म अर्पण करून भगवान भोलेनाथाची पूजा करावी. शुक्र प्रदोष व्रत आणि उपासना केल्याने माणसाला मोक्षाचा मार्ग खुला होतो. तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. दुसरीकडे, शुक्र प्रदोष व्रताच्या रात्री विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्ती धनवान बनू शकते. त्याला जीवनात सर्व सुख, सौभाग्य आणि अपार संपत्ती मिळते
प्रदोष व्रताच्या दिवशी करू नये 'या' गोष्टी
- प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला कुंकू, हळद, तुळशी आणि नारळाचं पाणी अजिबात अर्पण करू नये. यामुळे या व्रताचा लाभ मिळत नाही,अशी मान्यता आहे.
- प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये. असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं, असं म्हणतात.
- प्रदोष व्रतात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. व्रताच्या दिवशी सात्विक राहिल्यास मानसिक शांती लाभते.
- प्रदोष व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन कराला लागतो.
- उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकस आणि सात्विक आहार घ्यावा.
- काळा रंग नकारात्मकता आकर्षित करतो, यामुळे प्रदोष व्रतादिवशी काळे वस्त्र परिधान करू नये.
हे ही वाचा :