Chanakya Niti:  आचार्य चाणक्य यांनी समाजाला सभ्य बनवण्यासाठी नीती ग्रंथ ‘चाणक्य नीती’मध्ये (Chanakya Niti) अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला जीवनाचे मार्गदर्शन करतात. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. अनेक वेळा मेहनत करूनही कोणत्याही कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, काही प्राण्यांच्या गुणांपासून शिकून व्यक्ती जीवनात यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञान कुठूनही घेता येते. काही प्राणी-पक्ष्यांचे गुणही माणसाला शिकता येतात. असाच एक प्राणी आहे तो म्हणजे कुत्रा (Dog) ...   मात्र ‘कुत्र्यासारखे वागविणे’, ‘कुत्र्याचे जिणे जगणे’, असे वाक्प्रचार आपल्या कानावर पडतात. पण याच  कुत्र्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे, असे चाणक्य म्हणतात.  चाणक्य नीती सांगते की, कुत्र्याकडून काही गोष्टी जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार आहे.


समाधानी असणे


आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, कुत्र्यांमध्ये जी समाधानी भावना असते ती मानवांमध्येही असायला हवी. कुत्र्याला भूक लागल्यावर जे मिळेल ते खाऊन तृप्त होतो. त्याचप्रमाणे माणसाला आयुष्यात जे काही मिळेल त्यात समाधान मानायला हवे. पुष्कळ वेळा अधिक मिळवण्याची इच्छा तुम्हाला विनाशाच्या मार्गावर घेऊन जाते. जर तुम्ही समाधानी जीवन जगलात तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.


जागसुद झोप 


झोपेत जागसुद असावे.  सहसा घरातील वडीलधारी मंडळी मुलांना सांगतात की एकटे असाल तर जागसुद झोपायला हवे. म्हणजे झोप ही नेहमी कुत्र्याच्या झोपेसारखी असावी. कुत्रा हा थोड्याशा आवाजाने लगेच सावध होतो. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जर तुम्ही कुत्र्यासारखे झोपलात तर तुम्ही सावध  आणि सुरक्षित देखील राहू शकता.


विश्वासू आणि निष्ठावान


कुत्रा किती निष्ठावान आणि प्रामाणिक असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि म्हणूनच लोक घरात कुत्रे पाळतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, मानवानेही एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहण्याचे गुण कुत्र्याकडून शिकले पाहिजेत. हे दोन्ही गुण जीवनात यश मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.


धाडसी स्वभाव


कुत्रा हा धाडसी प्राणी आहे आणि आपल्या मालकासाठी काहीही करू शकतो हे तुम्ही पाहिलेच असेल. कुत्रा आपल्या मालकाचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो. कोणतेही धाडस तो करतो.  माणसानेही कुत्र्याकडून धाडसी राहण्याचा गुण शिकला पाहिजे. जेणेकरून घाबरून न जाता प्रतिकूल परिस्थितीचा सामना करता येईल.


हे ही वाचा :


काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या कावळ्याकडून शिका या पाच गोष्टी; चाणक्य म्हणतात, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल!


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)