Pradosh Vrat 2024 : हिंदू धर्म मान्यतेनुसार, प्रत्येक महिन्यात काही खास व्रत असतात. यामध्ये प्रदोष व्रत (Pradosh Vrat) हा सर्वात खास व्रत मानलं जातं. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याला त्रयोदशी तिथी असते. ही त्रयोदशी तिथी शुक्ल आणि कृष्ण पक्षात येते. या दिवशी भगवान शिव (Lord Shiva) आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. त्यानुसार, डिसेंबर महिन्यातलं पहिलं प्रदोष व्रत 13 डिसेंबर रोजी असणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी व्रत ठेवल्याने सुख-समृद्धीत चांगली वाढ होते. त्यामुळे शुक्र प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त नेमका काय? तसेच,पूजा आणि विधी नेमकी कधी ते जाणून घेऊयात.
शुक्र प्रदोष व्रत शुभ मुहूर्त (Pradosh Vrat 2024 Shubh Muhurta)
हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्र पक्षाच्या त्रयोदशी तिथीची सुरुवात 12 डिसेंबर 2024 च्या रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी झाली. तर, या तिथीची समाप्ती 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दरम्यान तुम्ही कधीही पूजा करु शकता.
शुक्र प्रदोष व्रत पूजा विधी (Pradosh Vrat 2024 Puja Vidhi)
प्रदोष व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर मंदिराची साफसफाई करा. तसेच, भगवान शंकराच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. शिवलिंगावर जल चढवा. तसेच, बेलपत्र, फूल, आणि भांग अर्पण करा. पूजेच्या दरम्यान भगवान शंकराच्या मंत्राचा जप करा. आणि आरती करा.
शुक्र प्रदोष व्रताचं महत्त्व (Pradosh Vrat 2024 Importance)
शुक्रवारच्या दिवशी प्रदोष व्रत असल्याने याला शुक्र प्रदोष व्रत म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, शुक्र प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. तसेच, शत्रूवर विजय मिळवता येतो. त्याचबरोबर आयुष्यातील स्रव संकटांपासून मुक्ती मिळते. प्रदोष व्रत विशेषत: विवाहित महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :