PM Modi Oath : 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने 292 जागा जिंकल्या आणि बहुमताचा आकडा पार केला. तर भाजपला 240 जागा मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा प्रधानमंत्री (PM Modi) पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवशी कोणकोणते शुभ योग (Yog) जुळून आले आहेते ते जाणून घेऊयात.
आज संध्याकाळी 7.15 मिनिटांनी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तयार होणारे शुभ आणि शक्तिशाली योग कोणते ते जाणून घेऊयात.
आजच्या दिवशी जुळून आलेत 'हे' शुभ योग
हिंदू कॅलेंडरनुसार, 09 जून आज रविवार आहे. आजच्या दिवशी ज्येष्ठ शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. या दिवशी वृद्धी आणि ध्रुव योग जुळून आले आहेत. तर, रात्री 8.20 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र आणि त्यानंतर पुष्य नक्षत्र राहणार आहे. आजच्या दिवशी चंद्र कर्क राशीत आहे.राहुकाल संध्याकाळी 05:27 ते 07:07 पर्यंत राहील. अशा स्थितीत राहुकाल संपल्यानंतर आणि आज रात्री 8.20 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र असणार आहे या नक्षत्रात नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत.
पंतप्रधानपदाची शपथ यापूर्वी 8 जूनला घेतली जाणार होती.मात्र नंतर ही तारीख बदलून 9 जून करण्यात आली. ज्योतिषशास्त्रानुसार 9 जून हा रविवार असून तो सूर्याचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा आणि सत्ताधारी शक्तीचा कारक म्हटले जाते.
'या' दोन ग्रहांचा प्रभाव
अंकशास्त्रानुसार, 9 तारीख म्हणजेच 9 हा अंक मंगळ ग्रहाद्वारे दर्शविला जातो, जो ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा कारक आहे. अशा प्रकारे पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या दिवशी सूर्य आणि मंगळाचा प्रभाव असणार आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या प्रभावाखाली स्थापन झालेले नवे सरकार देश आणि जगासाठी फायदेशीर ठरण्याची दाट शक्यता आहे.
आज रात्री 8.20 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र असणार आहे या नक्षत्रात नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. धार्मिक दृष्टीकोनातून हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते, कारण भगवान रामाचा जन्म याच नक्षत्रात झाला होता. पंतप्रधान मोदी हेही प्रभू रामाचे निस्सीम भक्त आहेत.
हिंदू धर्मात प्रत्येक कामासाठी शुभ-अशुभ तिथी आणि नक्षत्र सांगितले आहेत, त्यामुळे कार्य यशस्वीपणे पूर्ण होते. ज्योतिषशास्त्रानुसार, कॅलेंडरमधील 4 था, 9वा, अमावस्या, चतुर्दशी आणि पौर्णिमा हे दिवस शपथ घेण्यासाठी शुभ मानले जात नाहीत. रोहिणी, पुष्य, अनुराधा, ज्येष्ठा, मृगाशिरा, श्रावण, उत्तराषाढ, रेवती, उत्तराभाद्रपद आणि अश्विनी नक्षत्र हे शपथविधी शुभ मानले जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: