Pitru Paksha 2024 : गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेला पितृ पक्ष (Pitru Paksha 2024) पंधरवड्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या 15 दिवसांच्या काळात पितरांचं श्राद्ध करतात. या निमित्ताने देशातील सर्व ठिकाणी श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी येतात. या दिवशी पितरांचं श्राद्ध करतात. तसेच, मृत लोकांचे श्राद्ध, तर्पण करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की जगात असेही लोक आहेत जे जिवंत असताना श्राद्ध आणि पिंडदान करतात. यासाठी ते खास मंदिरात जातात. 


जनार्दन मंदिर, गया 


बिहार राज्यातील गया तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. गयेत मृत व्यक्तींचं श्राद्ध आणि पिंडदानासह जीवित लोकांचं सुद्धा श्राद्ध आणि पिंडदान करतात. गयेतील जनार्दन मंदिर हे संपूर्ण जगातील असं एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी आत्मश्राद्ध म्हणजेच जिवंतपणीच स्वत:चं पिंडदान केलं जातं. या ठिकाणी लोक जिवंतपणीच आपलं श्राद्ध आणि पिंडदान करतात. 


जनार्दन मंदिर गयेत भस्मकूट पर्वतावर देवी मंगळा गौरी मंदिराजवळ आहे. मान्यतेनुसार, या ठिकाणी भगवान विष्णू स्वयं जनार्दन स्वामीच्या रुपात पिंडाचं ग्रहण करतात. 


यासाठी करतात जिवंतपणी श्राद्ध...


आता प्रश्न असा पडतो की, असं कोणतं कारण आहे की लोक जिवंतपणीच पिंडदान करतात. तर, यामागचं कारण म्हणजे, हे कार्य ज्यांना मूलबाळ नाही किंवा ज्यांच्या कुटुंबात पिंडदान करण्यासाठी कोणी नाही असे लोक करतात. तसेच, संज्ञासी लोक देखील या ठिकाणी पिंडदान करतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Sarva Pitru Amavasya 2024 : पितरांचा आशीर्वाद मिळवण्याची शेवटची संधी! शेवटच्या क्षणी करा 'हे' काम पितर होतील खुश, पापांपासून मिळेल मुक्ती