Pitru Paksha 2024 : कावळा हा पक्षी फारसा कोणाचा प्रिय नसतो किंवा आपण कोणाला कावळ्याला (Crow) पाळताना किंवा त्याला काही खाऊ घालताना पाहिलं नसेल. पण पितृपक्षाच्या (Pitru Paksha) काळात लोक मात्र आवर्जून कावळ्याला शोधतात आणि त्याला अन्न देतात. याचं कारण म्हणजे, हिंदू धर्मात कावळ्याला पितरांचं प्रतीक मानण्यात आलं आहे.
असं म्हणतात की, कावळ्याला अन्न दिल्यास पितर खुश होतात. पण, कावळ्याशी संबंधित अशा काही घटना असतात की ज्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा संदेश मिळतो.
कावळ्याचा तुमच्या घरी येण्याचा संकेत
पौराणिक मान्यतेनुसार, कावळा जर तुमच्या घरी येत असेल तर नक्कीच ते कोणता ना कोणता संदेश घेऊन येतात. कारण कावळ्यांना धरती आणि यमलोकला जोडणारा दूत मानला जातो. कावळा आपल्या पितरांचा संदेश घेऊन येतो. आणि आपल्या संदेश पितरांपर्यंत पोहोचवतो.
कावळा पाणी पिताना पाहिल्यास...
जर तुम्ही पितृपक्षात कावळ्याला पाणी पिताना पाहिलं तर समजून जा की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. याशिवाय तुमच्या घरात सुख, शांती टिकून राहील हा देखील संकेत यातून मिळतो.
कावळा डोक्यावर बसण्याचा संकेत
धार्मिक मान्यतेनुसार, जर कावळा एखाद्याच्या डोक्यावर बसला असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणारं संकट दूर होतं. हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे.
कावळ्याची चोचीत पोळी ठेवणे
जर कधी तुम्ही स्वत:ला चोचीत पोळी ठेवताना पाहिलं असेल तर किंवा एखाद्या कावळ्याने आपल्या चोचीत चपाती तुमच्या घरापर्यंत आणली असेल तर येणाऱ्या दिवसांत तुमच्या धनधान्यात चांगली वाढ पाहायला मिळेल. तुमच्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: