पुणे: पुणे स्टेशनवरून (Pune Station) रोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कारण लाखो प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी पुणे स्टेशनच्या (Pune Station) परिसरात फक्त 74 सीसीटीव्ही (CCTV) कार्यान्वित आहेत. पुणे स्टेशनवर (Pune Station) 120 कॅमेरे नव्याने बसवण्याचा निर्णय अद्याप कागदावरच असल्याने कॅमेरे (CCTV) कधी बसवणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि सीसीटीव्ही (CCTV) बसवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ते अजूनही बसवण्यात आले नसल्याचं चित्र आहे.
अशातच आता नवरात्री, आणि काही दिवसांवर दिवाळी आली आहे. या दरम्यान लाखो प्रवासी प्रवास करतात त्यामुळे सीसीटीव्ही (CCTV) लवकरात लवकर बसवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. गर्दीच्या काळात पुणे स्टेशन (Pune Station) परिसरात अनेक लोक येतात, या काळात चोरीच्या मोठ्या घटना या परिसरात घडतात.
पुणे रेल्वे स्थानकात (Pune Station) आणि बाहेरील जास्तीत जास्त क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी आणि सर्व भाग कव्हर करण्यासाठी, रेल्वे संरक्षण दल (RPF) पुणे रेल्वे (Pune Station) स्थानकावर 120 कॅमेरे जोडणार आहे. स्टेशन परिसरात (Pune Station) 74 कॅमेरे आधीच वापरात आहेत. स्टेशन परिसरात विविध स्पॉट्स आहेत, विशेषत: मुख्य इमारतीच्या बाहेरचा परिसर, प्लॅटफॉर्मच्या शेवटी आणि पार्किंगजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV) आवश्यकता आहे. रात्रीच्या वेळी, अंधाराचा भाग असतो आणि या भागांमध्ये चोर फिरत असतात, जर कॅमेरे बसवले तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे होईल.