Pitru Paksha 2024 : सध्या पितृपक्ष (Pitru Paksha) सुरू आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितृ पंधरवडा (Pitru Paksha 2024) सुरू राहणार आहे. पितृपक्षाबाबत सर्वसामान्यांना विविध प्रकारचे प्रश्न असतात. यातील एक प्रश्न असा आहे की, पितृपक्षात सून आणि मुलगी पिंडदान करू शकतात की नाही?


सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृपक्षाच्या काळाताच पितरांचे पिंडदान केलं जातं. पिंड विशेषतः मृत पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केलं जातं. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवसापर्यंत चालू असतो. या काळात हिंदू कुटुंब त्यांच्या पूर्वजांचं स्मरण करतात आणि त्यांना श्राद्ध करतात. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावला, त्यांच्यासाठी हा काळ विशेषतः महत्वाचा आहे.


पितृपक्षात केलेलं दिवंगत आत्म्याचं पिंडदान त्यांना मोक्षाच्या दिशेनं घेऊन जातं. पिंड दान हे सहसा पुत्राद्वारे केलं जातं. मान्यतांनुसार, केवळ मुलगाच त्याच्या वडिलांच्या आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांती प्रदान करू शकतो. पण, अनेकजणांच्या मनात प्रश्न येतो की, मुलगी किंवा सून पिंडदान करू शकते का? 


विद्वानांच्या म्हणण्यानुसार, सून आणि मुली देखील पिंडदान करू शकतात. अनेक कुटुंब अशी आहेत की, ज्यांच्या घरात मुलगा नसतो. त्यामुळे अशावेळी सून किंवा मुलगी पिंडदान करण्याची परंपरा अनेक कुटुंबात पाहायला मिळते. असं मानलं जातं की, मुलगा नसेल तर त्या घरातली सून किंवा त्यांची मुलगी पूर्वजांप्रति श्रद्धा व्यक्त करू शकते. पुराणांनुसार, जर कुटुंबात मुलगा नसेल तर सून किंवा मुलीला पिंडदान करण्याचा अधिकार आहे. परंतु, हे लक्षात घेण्यासारखं आहे की, जी स्त्री पिंडदान करणार आहे, त्या दरम्यान तिच्या पतीनं तिच्यासोबत असणं आवश्यक आहे. म्हणूनच, जर तुम्ही सून किंवा मुलगी असाल आणि तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहायची असेल, तर पितृपक्ष तुमच्यासाठी योग्य प्रसंग आहे. 


पितृपक्षाच्या काळात मृत नातेवाईकांचं पिंडदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर, भूतांपासून संरक्षण करण्यासाठी पितृ तर्पण करणं आवश्यक आहे. पितृपक्षात पितरांना केलेला नैवेद्य त्यांना मुक्त करतो आणि भूतविश्वातून मुक्त होतो, असं म्हणतात. पितरांचे पिंड दान केले नाही तर पितरांचा आत्मा दुःखी आणि असमाधानी राहतात, असं म्हटलं जातं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pitru Paksha 2024: पितृ पक्षात 'या' दोन झाडांना जल अर्पण करा; पितर नेहमी प्रसन्न राहतील