Pisces Monthly Horoscope : जर तुमची रास मीन असेल तर या महिन्यात तुम्हाला दान करण्याची संधी मिळाल्यास नक्की करा याने तुम्हाला मोठं पुण्य लाभणार आहे. या काळात केलेलं नेटवर्क तुम्हाला भविष्यात नक्कीच फार कामाला येईल. तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होऊ शकते. तुम्हाला फक्त सतर्क रहावं लागेल. कोणत्याही अडचणींचा सामना करताना धैर्य आणि संयमातून त्यातून मार्ग काढा. न्याय व्यवस्था आणि फायनान्सशी संबधित कामांसाठी हा महिना उपयुक्त ठरणार आहे. 21 एप्रिलपर्यंत विरोधी सक्रिय होऊ शकतात पण तुम्ही स्वत:ला कमी पडू देऊ नका. यावेळी भूतकाळात बिघडलेले संबंध पुन्हा ठिक होण्यासाठी काही संधी मिळतील याचा योग्य वापर करा. नवरात्रीच्या दिवसांत किमान एकदा तरी हनुमान चालिसा पठण करावी, याने मानसिक स्वास्थ ठिक होईल.


आर्थिक आणि कारकिर्द- या महिन्यात कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात करु शकता. नोकरीने संबधित चांगल्या व्यक्ती भेटू शकतात, ज्यामुळे नोकरीमध्येही चांगला फायदा होऊ शकतो. मीटिंग होती, त्यातून नव्या जबाबदाऱ्या मिळतील ज्याची प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने तुम्ही करु शकता. मार्केटमध्येही गुंतवणूकदारांना फायदा होईल. राजकारणात सक्रिय लोकांचा जनसंपर्क वाढू शकतात. व्यापारात फायदा होईल पण काही ठिकाणी अडकलेले पैसे चिंता वाढवतील.


आरोग्य- प्रकृती संबधित काही अडचणी येतील. तुमचं वजन अधिक असल्यास ह्रदयाच्या चांगल्या स्थितीसाठी तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल. लहान मुलांकडे खेळताना त्यांच्याकडे लक्ष्य द्या. दात, ओठ कंबर अशा भागांची काळजी घ्या. काम करताना, बसताना विशेष काळजी घ्या. अन्यथा, स्लिप डिस्क सारख्या अडचणी येऊ शकतात. गर्भवती महिलांनाही विशेष काळजी घ्यावी लागू शकते. मोबाईलचा अनावश्यक वापर मानसिकदृष्ट्या ठिक नसेल.


कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील- कुटंबाला घेऊन काही नव्या जबाबदाऱ्या वाढतील. पण त्याला घेऊन चिंतेची कोणतीही बाब नाही. वडिलांची काळजी घ्या, नवरा, सासरे यांची प्रकृती ठिक नसल्यास त्यांची काळजी घ्या. तुमच्या जीवनसाथी असणाऱ्या व्यक्तीला ज्ञान आणि करियरमध्ये यश मिळेल.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा-