Pisces Horoscope Today 15 June 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही मुलांबरोबर वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा चांगले राहील. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैशामुळे थांबलेली तुमची कामे पूर्ण होतील. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील, तर ते तुम्हाला आज न मागता परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. जुन्या गुंतवणुकीमुळे (Investment) उत्पन्नात वाढ होईल.
करिअरच्या दृष्टीने मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. आजचा दिवस व्यावसायिक कार्यात आर्थिक लाभाचा आहे. व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. व्यवसायात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाल्याने तुमचे काम पुन्हा सुरळीत सुरु होईल. नोकरदार वर्गासाठी देखील आजचा दिवस कामात व्यस्ततेचा असेल. नीट लक्षपूर्वक काम करा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
मीन राशीच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबात चांगलं वातावरण राहील पण काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. मुलांचे शिक्षण आणि करिअरची चिंता राहील. आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. नकळत तोंडून असे उच्चार काढू नका ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होईल. यासाठी वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
मीन राशीचे आजचे आरोग्य
आज तुम्हाला सांधेदुखी आणि मानदुखीचा त्रास होऊ शकतो. दिर्घकालीन आजार असल्या कारणाने तुम्हाला भरपूर वेदना जाणवू शकतात. अशा वेळी विश्रांती घ्या. आणि जड वस्तू उचलू नका.
मीन राशीसाठी आजचे उपाय
आजच्या दिवशी रामरक्षा स्त्रोत्राचा पाठ करणे लाभदायक ठरेल. आज पूजेत भगवान विष्णूला पिवळा तांदूळ अर्पण करा.
मीन राशीसाठी आजचा शुभ रंग
मीन राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :