Pisces Horoscope Today 09th March 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक संबंधात प्रेम आणि जवळीक वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळाल्याने आनंद होईल. शेजाऱ्यांशी संबंध दृढ होतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. 


आज कुटुंबातील सदस्यांबरोबर विशेषत: लहान मुलांबरोबर वेळ घालवल्यानंतर तुम्ही खूप आनंदी व्हाल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमचे कुटुंबीय आज तुमच्यासोबत अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्या समजून घेऊन त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. तसेच, मोकळ्या वेळेत तुम्हाला आवडेल असे काहीतरी करा.


घरगुती वातावरण आनंदी राहील


व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न वाढवा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. राजकीय क्षेत्रात चर्चा फलदायी ठरेल. मित्र-मैत्रिणींबरोबर मनमोकळेपणाने गप्पा माराल. घरगुती वातावरण आनंदी असेल. धार्मिक गोष्टींत सहभाग घ्या. मानसिक समाधानासाठी योग करा. यामुळे तुमचं आरोग्यदेखील उत्तम राहील. 


आजचे मीन राशीचे आरोग्य :


मीन राशीच्या लोकांच्या पायात सूज आणि पाय दुखण्याची समस्या असू शकते. त्यामुळे विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा.


मीन राशीसाठी आजचे उपाय :


घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी शुक्रवारी केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. त्यांनाही टिळक लावा. यामुळे कुंडलीत गुरूची स्थितीही मजबूत होते.


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य