Paush Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी 21 जानेवारी 2024 रोजी, म्हणजेच रविवारी आहे. यंदाची पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2024) एक अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते. एकादशी हे पापांपासून मुक्ती देणारं व्रत आहे.
एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतं, श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं. या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात. पौष पुत्रदा एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.
पौष पुत्रदा एकादशी 2024 शुभ योग
पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, ब्रह्मयोग, शुक्ल योग आणि त्रिग्रही योग हे 5 दुर्मिळ योग तयार होत आहेत. या योगांमुळे 21 जानेवारी या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. या शुभ योगांच्या वेळा पाहा.
- सर्वार्थ सिद्धी योग - पहाटे 03:09 ते सकाळी 07:14 (21 जानेवारी 2024)
- ब्रह्मयोग - 21 जानेवारी सकाळी 10:02 ते 22 जानेवारी सकाळी 08:47
- शुक्ल योग - 20 जानेवारी संध्याकाळी 07:26 ते 21 जानेवारी संध्याकाळी 07:26
- अमृत सिद्धी योग - पहाटे 03:09 ते सकाळी 07:14 (21 जानेवारी 2024)
- त्रिग्रही योग - या दिवशी बुध, मंगळ आणि शुक्र धनु राशीत असतील, यामुळे त्रिग्रही योग तयार होईल, अशा स्थितीत या दिवशी विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.
पौष पुत्रदा एकादशीसाठी उपाय (Putrada Ekadashi Upay)
- पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी संत गोपाल मंत्र 'ओम देवकीसुत गोविंद वासुदेव जगत्पते, देही मे तनयम् कृष्ण त्वमहम् शरणम् गतः' हा तुळशीच्या जपमाळाने 5 वेळा जप करावा. मूल होण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे.
- पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णु सहस्त्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.
- भगवान विष्णूला पिवळ्या फुलांनी हार घालावा. श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावणे विशेष फलदायी असते. त्यानंतर तो स्वतः लावा, यामुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: