Chaturgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतात. या ग्रह संक्रमणामुळे कधी शुभ योग, तर कधी राजयोगाची निर्मिती होते. दोनपेक्षा अधिक ग्रह एकाच राशीत एकत्र आले की विविध योग बनतात. आता लवकरच धनु राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग होणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग, आदित्य मंगल राजयोग, बुधादित्य योग, धन योग यांसह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडेल. हे योग विशेषत: 3 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहेत, या राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
चतुर्ग्रही योग मेष राशीच्या भाग्य स्थानात निर्माण होणार आहे, त्यामुळे हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरीच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळणार आहे. व्यावसायिकांना या काळात चांगला आर्थिक लाभ होईल, तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. कामाशी किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या पाचव्या भावात चतुर्ग्रही योग निर्माण होणार असल्याने तुमचं भाग्य उजळणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला चांगली गती मिळेल. तसंच या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचं पूर्ण सहकार्य लाभेल. तसंच या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळणार आहेत. तुमच्या मुलांची चांगली प्रगती होईल.
कन्या रास (Virgo)
चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार असल्याने तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. जर आपण नोकरदार लोकांबद्दल बोललो तर, त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीचे शुभ संकेत आहेत. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: