Paush Amavasya 2022 : 2022 वर्ष (2022 Year) संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. 2022 वर्षाची शेवटची पौष अमावस्या (Paush Amavasya) 23 डिसेंबरला आहे. हिंदू धर्मात (Hindu Religion) पौष अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण वगैरे करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. याच शास्त्रात पौष अमावास्येला छोटा पितृपक्ष असेही म्हणतात. म्हणूनच या महिन्यात पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, सत्कर्म इत्यादी केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. इतर अमावस्यांपेक्षा ही अमावस्या अधिक महत्त्वाची

23 डिसेंबर 2022 ला हा पौष महिन्यातील अमावस्या आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाचा हा शेवटचा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसापासून शुक्ल पक्ष सुरू होईल. पौष महिन्यातील अमावास्येला स्नान करून तीर्थ दान करण्याची परंपरा आहे. वर्षातील इतर अमावस्यांपेक्षा ही अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते. पितरांनाही या सणात श्राद्ध केल्याने समाधान मिळते. पौष महिन्याची अमावस्या अतिशय शुभ संयोगाने येत आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा विशेष योगायोग आहे. वर्षातील शेवटच्या अमावस्येचे शुभ योग आणि उपाय जाणून घ्या.

मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरी होते 'वेळा अमावस्या'महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या हिंदू पंचागानुसार गुरुवार 22 डिसेंबर 2022 आणि शुक्रवार 23 डिसेंबर 2022 रोजी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या आहे. ही 2022 या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. या अमावास्येला वेळा अमावस्या असेही म्हणतात.  पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. (vel amvasya) या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात. (people celebrate amvasya) तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटतात. वेळ अमावस्येला बोली भाषेत 'येळवस' असेही म्हटले जाते. यावेळी शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसेच रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवीकडे प्रार्थना केली जाते. मराठवाड्यात दरवर्षी या सणाचा एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. (vel amvasya)

वेळ अमावस्या हिवाळ्यातच का साजरी होते?आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते.

पौष अमावस्येला शुभ योगायोगज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी पौष अमावस्येला असा शुभ योगायोग घडत आहे. यामुळे पितरांसह माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास असेल. पौष अमावस्या 23 डिसेंबरला आहे. तर हा दिवस शुक्रवार आहे, तसेच हा दिवस देवी लक्ष्मीलाही समर्पित आहे. या दिवशी केलेले उपाय पितरांसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून दुहेरी लाभ देतात. अमावस्या तिथी 22 डिसेंबरच्या संध्याकाळी 7:13 पासून सुरू होईल आणि 23 डिसेंबर रोजी दुपारी 3:46 पर्यंत असेल. 

पितृदोषाच्या शांतीसाठी पूजा करावीपौष अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. हे शक्य नसेल तर घरात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करा. आणि तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. या दिवशी गरीब, दुःखी आणि गरजू लोकांना मदत करून पितरांना प्रसन्न केले जाते. त्याच पितृदोषाच्या शांतीसाठी पूजा करावी. यासोबतच पितरांना तांदळाची खीर अर्पण करावी, असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.

या दिवशी काय दान करावे?

या दिवशी उबदार लोकरीचे कपडे, तीळ, तेल, वहाणा, आवळा, फळे, मैदा, साखर, तांदूळ, मध, तूप, आरसा इत्यादी दान करावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

वेळ अमावस्येसाठी मराठवाडा सज्ज, गावं पडणार ओस, वेळ अमावस्येचं महत्त्व काय ?