Pandharpur: पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Mandir) हे हिंदू धर्माच्या भक्ती परंपरेचे एक धार्मिक केंद्र आहे. याला "दक्षिणेची काशी" म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात, विशेषतः आषाढी आणि कार्तिक एकादशी महिन्यात येथे भक्तांची मांदियाळी असते. हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेले आहे. भगवंत विठ्ठल-रूक्मिणी या देवतेच्या मूर्तीला बाराही महिने चंद्रभागेच्या पाण्याचे स्नान घालण्यात येत असते, एका सामाजिक कार्यकर्त्यांने चंद्रभागेच्या पाण्यात गंगाजल मिसळण्यात येत असल्याचा आरोप मंगळवारी मंदिर समितीवर केला होता. यावर आज मंदिर समितीने खुलासा केला आहे.
विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याचे स्नान
पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणी माता यांना बाराही महिने चंद्रभागेच्या पाण्याचे स्नान घालण्यात येत असते. काही भावीक देवाच्या स्नानासाठी गंगेचे पाणी अर्पण करतात. भाविकांच्या इच्छेनुसार चंद्रभागेच्या पाण्यात कधीतरी गंगेचे पाणी मिसळले जाते, असा खुलासा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात दिसलेल्या गंगाजलाच्या काही टब वरून काल मंदिर समितीवर हा आरोप केला होता. यावर आज मंदिर समितीने हा खुलासा केला आहे. चंद्रभागा ही सर्वात पवित्र तीर्थ असून माध्यमांनी समयी अवघ्या विश्वाची तीर्थ चंद्रभागेत स्नानासाठी येत असल्याचा संतांचा दाखला यावेळी औसेकर महाराज यांनी दिला. तसेच कधीकधी भाविकांच्या इच्छेनुसार अर्पण केलेले गंगेचे पाणी फक्त थोडे मिसळले जाते असं सांगत औसेकर यांनी आरोप फेटाळले
केशरयुक्त सात्विक पाण्याने देवाचा अभिषेक
विठ्ठल मूर्तीची झीज होत असल्याने पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार केशर युक्त सात्विक पाण्याने देवाचा अभिषेक केला जात असतो. देवाला घालण्यात येणारे दही दूध पंचामृत हे देवाच्या केवळ पायावर घातले जाते. देवाच्या मूर्तीचे संरक्षण हे सर्वात महत्त्वाचे असून पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार आणि परंपरेचे पालन करूनच रोज देवाला चंद्रभागेच्या पाण्याचा अभिषेक होत असतो, असे त्यांनी सांगितले.
चंद्रभागा सर्वांसाठी अत्यंत पूजनीय
तेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा... असे महत्त्व असलेली चंद्रभागा सर्वांसाठी अत्यंत पूजनीय आहे. त्यामुळे तिचा अपमान करायचा विषयच नसल्याचा खुलासाही मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला.
हेही वाचा :
October 2025 Monthly Horoscope: आजपासून ऑक्टोबर महिना सुस्साट! 17 तारखेनंतर 'या' 5 राशींचा गोल्डन टाईम, कोणासाठी टेन्शनचा? 12 राशींचे मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)