October 2025 Astrology: सप्टेंबर (September 2025) महिना हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांनी राशीपरिवर्तन केलंय. आता सप्टेंबर महिना तसा संपत आला आहे, आणि ऑक्टोबर (October 2025) महिनाही लवकरच सुरू होईल. ऑक्टोबर हा विविध सण तसेच ग्रह आणि ताऱ्यांसाठी (Astrology) एक विशेष महिना असेल. या काळात अनेक प्रमुख ग्रह त्यांच्या राशी बदलतील. याचा मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर परिणाम होईल. काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल, तर काहींवर नकारात्मक परिणाम होईल. ऑक्टोबरमध्ये कोणते ग्रह त्यांच्या राशी बदलतील ते जाणून घेऊया.
ऑक्टोबरमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार
ज्योतिषशास्त्रानुसार (Astro), ऑक्टोबरमध्ये बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ यासह अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलतील. याचा या 4 राशींवर सकारात्मक परिणाम होईल आणि त्यांच्या समस्याही सुधारू लागतील. जाणून घेऊया त्या चार राशी कोणत्या आहेत.
बुध आधी 3 ऑक्टोबर आणि नंतर पुन्हा 24 ऑक्टोबर रोजी आपली राशी बदलेल. यानंतर, 9 ऑक्टोबर रोजी शुक्र कन्या राशीत, तर 17 ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत संक्रमण करेल.
मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तर शनि मीन राशीत, गुरु मिथुन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असेल. याचा 4 राशींवर सकारात्मक परिणाम होईल. जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल...
'या' 4 राशींना लागणार लॉटरी..!
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी आणि पगारात वाढ होईल. बेरोजगार व्यक्तींनाही चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिना फायदेशीर राहील. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल, आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि कुटुंब आणि प्रेमसंबंध अधिक सुसंवादी होतील. अविवाहित व्यक्तींनाही लग्नाची शक्यता आहे.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ राहील. उत्पन्न वाढेल आणि नवीन व्यवसायाच्या संधी उघडतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि मोठी ध्येये साध्य करण्यात यश मिळेल.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना फायदेशीर राहील. करिअरमध्ये प्रगती होईल, आत्मविश्वास वाढेल आणि उत्पन्न वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमचा आदरही वाढेल.
हेही वाचा :
Rahu Transit 2025: पुढचे 14 महिने राहू 'या' 4 राशींची पाठ सोडणार नाही! देवी धावणार संरक्षणासाठी, संकटमुक्तीसाठी 'हे' उपाय एकदा पाहाच..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)