Numerology Today 28 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. आज मूलांक 1 असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, पण जोडीदाराशी मतभेद होण्याची चिन्हं आहेत. आज पैशाशी संबंधित मोठे निर्णय घेणे टाळा.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या लोकांना नोकरीत प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या कामाचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. गैरसमजांमुळे लव्ह लाईफमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होईल.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. पैशाची आवक वाढेल. आर्थिक बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. तुम्हाला कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवनात काही अडचणी येतील. वैवाहिक जीवनात मात्र आनंदी वातावरण राहील. आज तुमच्या जीवनशैलीत मोठे बदल होतील.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. ग्रुपसोबत मिळून केलेल्या कामात मोठे यश मिळेल. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. पाहुण्यांच्या आगमनामुळे मन प्रसन्न राहील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक क्रमांक 5 असलेल्या लोकांना कठोर परिश्रमाने, मेहनतीने केलेल्या कामात मोठे यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी भरपूर संधी मिळतील. आज तुम्ही घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्व कामे यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळा.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत नशीब तुम्हाला साथ देईल. दीर्घ आजारापासून आराम मिळेल. घरात सुख-समृद्धी नांदेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आनंदी जीवन जगाल.


मूलांक 7


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांना करिअरमध्ये प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. ऑफिसमध्ये तुमच्या नवीन ओळखी होतील. कामाचं कौतुक होईल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. तुमच्या सर्व कामात तुम्हाला मोठं यश मिळेल. संवाद कौशल्य सुधारेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याची योजना आखू शकता. आज तुम्ही चिंतामुक्त जीवन जगाल.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. आज मूलांक 8 असलेल्या लोकांनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. मित्रांच्या मदतीने कामातील अडथळे दूर होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहील. अतिरिक्त खर्च होईल. संयम ठेवा आणि घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. यामुळे जीवनात आनंद मिळेल आणि मन प्रसन्न राहील.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आज मूलांक 9 असलेल्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर तुमच्या भावना व्यक्त करू शकता किंवा तिला/त्याला प्रपोज करण्याची योजना आखू शकता. तुम्ही नोकरी बदलण्याची योजना करू शकता. आज घरात आनंदी वातावरण असेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. काही लोक आज जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Mobile Wallpaper : मोबाईलवर 'हा' वॉलपेपर ठेवल्याने बनतात धनप्राप्तीचे योग; बँक बॅलन्स वाढतो