Numerology Today 15 November 2023: अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. या लोकांना आज सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही आज तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. 


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज तुम्ही डबल नफा कमवू शकता. आज तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील तुम्हाला सफलता मिळेल. व्यावसायिक लवकर नफा मिळवण्याच्या नादात नुकसान देखील करुन घेऊ शकतात.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या लोकांनी आज भावनेच्या भरात निर्णय घेणं टाळावं. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सहकार्य मिळेल. करिअर आणि व्यवसायात अनिश्चितता असू शकते.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. या लोकांना आज थोड्या प्रयत्नांनंतर हव्या असलेल्या गोष्टीत यश मिळेल. आज तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम कराल. आज तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. आज तुम्ही करिअर आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित कराल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आज तुम्ही नवीन मित्र बनवू शकता. तुमचं कौटुंबिक जीवन आज आनंदी असेल.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. या लोकांनी खर्च करण्याआधी विचार करावा. आज तुम्ही वाद टाळावा. तुम्ही जवळच्या माणसांसाठी जास्त काम कराल. मित्रांच्या सहकार्यामुळे तुम्ही चांगलं काम करू शकाल. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल.


मूलांक 7 


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. तुमचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आज तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकतं, एखादी खास भेट मिळू शकते. आज तुमच्या व्यवसायात वाढ होईल.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही टार्गेट वाढवण्यावर भर दिला पाहिजे, तरच तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. वैयक्तिक गोष्टींबाबत तुम्ही आत्मविश्वास ठेवला पहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. आज तुम्हाला मोठी उद्दिष्टं साध्य करता येतील. सर्वजण तुमचं कौतुक करू शकतात. आज तुमची व्यावसायिक प्रगती होईल. आज तुमच्या कुटुंबात आनंद वाढेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Shani Margi: 2024 मध्ये 'या' राशींना बसणार शनीची झळ; चुकूनही करू नका 'हे' काम