Numerology Of Mulank 8 : ज्योतिष शास्त्रात राशीभविष्याप्रमाणे अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्राला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. अंक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या मूलांकावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. या शास्त्रात 1 ते 9 मूलांक असतात. त्याप्रमाणे मूलांक (Mulank) 8 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.
अंक ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. आपल्याला माहीतच आहे की, मूलांक 8 हा शनीचा क्रमांक आहे. त्यामुळे हे लोक फार मेहनती आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यामुळे यांच्या प्रयत्नांना यश येतं.
शांत आणि गंभीर स्वभावाचे असतात
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा स्वभाव फार शांत आणि गंभीर असतो. हे लोक एकांतात राहणं पसंत करतात. फार गोंधळात राहायला यांना आवडत नाही. तसेच, लोकांशी संवाद साधायला, एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये जायला यांना आवडत नाही. तसेच, या जन्मतारखेचे लोक फार कंजूस स्वभावाचे असतात. आपले पैसे नेहमीच जपून ठेवतात. कोणाशीही पैशांचा व्यवहार करणं यांना आवडत नाही.
फार महत्त्वाकांक्षी असतात
या जन्मतारखेचे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करतात. तसेच, आयुष्यात येणाऱ्या संकटांचा मोठ्या धैर्याने हे सामना करतात. यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते. हे लोक नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला जास्त प्राधान्य देतात. यामध्ये त्यांना जास्त फायदा मिळतो.
एकलकोंड्या स्वभावाचे असतात
या जन्मतारखेच्या लोकांना लोकांशी जास्त संवाद साधायला आवडत नाही. हे आपली स्वत:चीच कंपनी पसंत करतात. लव्ह रिलेशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, यांना अनेकदा प्रेमात धोका मिळतो. नातेसंबंध बिघडतात. तसेच, अनेक अडचणी येतात. त्यामुळेच यांना एकटं राहायला आवडतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :