Numerology Of Mulank 8 : ज्योतिष शास्त्रानुसार, राशींप्रमाणेच अंकशास्त्रालाही (Ank Shastra) महत्त्व देण्यात आलं आहे. आज आपण असाच एका मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे त्या लोकांचा मूलांक (Mulank) 8 असतो.
अंकशास्त्रात, या मूलांकाच्या संदर्भात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या अशा की, या जन्मतारखेच्या लोकांचं नशीब फार उशिराने उजळतं. यांचं आयुष्य इतरांप्रमाणे साधंसरळ नसतं. यांना सुरुवातीला फार संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, एका ठराविक काळाने यांचं नशीब चमकू लागतं.
सुरुवातीला संघर्षमय प्रवास
मूलांक 8 असणाऱ्या लोकांना आयुष्याच्या सुरुवातीला फार मेहनत घ्यावी लागते. वयाच्या 20 ते 30 पर्यंत यांना सतत अपयशाचा सामना करावा लागतो. मात्र, या जन्मतारखेचे लोक कधीच हार मानत नाहीत.
वयाची पस्तीशी ओलांडताच नशीब बदलतं
जेव्हा या जन्मतारखेचे लोक वयाची पस्तीशी ओलांडतात तेव्हा शनीच्या ढैय्या आणि साडेसातीचा सकारात्मक प्रभाव यांच्यावर दिसू लागतो. या दरम्यान त्यांना अचानक नवीन संधी मिळतात, प्रमोशन मिळते. तसेच, बिझनेसमध्ये नफा मिळायला सुरुवात होते.
शनीच्या कृपेने होतात कोट्याधीश
शनी ग्रह तसेच, शनी महाराज मूलांक 8 चा स्वामी आहे. जेव्हा शनी महाराज प्रसन्न होतात तेव्हा असा चमत्कार घडतो की, रातोरात व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. आपल्याला माहीतच आहे की, शनीला न्यायदेवता म्हणतात. त्याचप्रमाणे या जन्मतारखेच्या लोकांनाही सरळ मार्गाने पैसा कमावलेला आवडतो. त्यामुळे या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात.
आत्मविश्वास आणि निर्णयशक्ती
या जन्मतारखेच्या लोकांची वयाच्या पस्तीशीनंतर निर्णयक्षमता बदलू लागते. यांचे विचार अधिक परिपक्व होतात. तसेच, यांना योग्य निर्णय घेता येतो. तसेच, योग्य मार्गाने हे लोक विचार करु लागतात.
समाजात वाढतो मान-सन्मान
धन-संपत्तीबरोबरच मूलांक 8 असणाऱ्या लोकांना समाजात देखील मान-सन्मान मिळतो. समाजकार्याकडे यांचा जास्त कल असतो. तसेच, या जन्मतारखेचे लोक इतरांची मदत करताना मागे पुढे पाहत नाहीत. शनिदेवाप्रमाणेच हे लोक आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :