Numerology Of Mulank 7 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त्रालाही (Ank Shastra) फार महत्त्व आहे. ज्याप्रमाणे राशीनुसार माणसाचा स्वभाव, त्याच्या आवडी निवडी ओळखता येतात. त्याप्रमाणेच, अंकशास्त्राच्या आधारे माणसाचा स्वभाव ओळखता येतो. अंकशास्त्रात, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या यशाबद्दल, कामगिरीबाबत अंदाज लावता येतो. त्यानुसार, आज आपण मूलांक 7 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या लोकांची खासियत कोणती असते ते जाणून घेऊयात.
कसा असतो मूलांक 7 च्या लोकांचा स्वभाव?
अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मूलांक 7 चा स्वामी ग्रह केतू आहे. केतू हा एक आध्यात्मिक ग्रह आहे. तसेच, केतूला ज्ञान, विचारशीलता आणि आत्मविकासाचा स्वामी ग्रह मानला जातो. मूलांक 7 चे लोक फार आत्मविश्वासू आणि स्वतंत्र विचारांचे असतात. या जन्मतारखेचे लोक कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करतात आणि मगच निर्णय घेतात. तसेच, घेतलेल्या निर्णयावर हे लोक फार ठाम असतात. यांचा आध्यात्मिकतेकडे फार कल असतो. त्यामुळे हे जे काही यश संपादन करतात ते आपल्या बुद्धीच्या जोरावर करतात.
नशिबावर अवलंबून राहात नाहीत
या जन्मतारखेचे लोक फार संयमी स्वभावाचे असते. नशिबाच्या जोरावर अवलंबून न राहता प्रचंड मेहनतीने, कष्टाने आणि जिद्दीने यश संपादन करतात. तसेच, आपलं ध्येय गाठण्यासाठी हे लोक आपल्या विचारशीलतेचवर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असतात. या जन्मतारखेचे लोक यश संपादन करुन खूप पैसे कमावतात. तसेच, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे लोक इतरांपेक्षा फार पुढे असतात.
प्रेमात मिळत नाही यश
प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या जन्मतारखेच्या लोकांचं प्रेम जीवन फार रहस्यमयी असतं. कारण या लोकांना आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करायला आवडत नहाीत. या लोकांना जास्त लोकांमध्ये सहभाग घ्यायला देखील आवडत नाही. नेहमी हे लोक आपल्याच कामात व्यस्त असतात. मूलांक 7 असणारे लोक आपल्याच कामात व्यस्त असल्यामुळे यांचा इतरांशी फारसा ताळमेळ नसतो. त्यामुळे प्रेमाच्या बाबतीत हे इतरांपेक्षा मागेच असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: