Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रात, ब्रह्मांडात बुध ग्रह (Budh Gochar 2024) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध (Mercury) ग्रहाला मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी मानला जातो. तसेच, बुध ग्रह आपल्या वाणी आणि बुद्धीला नियंत्रित करणारा ग्रह देखील मानतात. हा ग्रह जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नकारात्मक स्थितीत असतो तेव्हा तो आपल्या त्वचा, तांत्रिक तंत्र, फुफ्फुसं आणि कानाशी संबंधित समस्या देण्याचं देखील कार्य करतात. 


ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह, 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजून 39 मिनिटांनी वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांचा सर्वात कठीण काळ लवकरच सुरु होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती फार कमजोर असणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कामाचा ताण वाढेल. तसेच, तुमच्या नात्यात विश्वासाची कमी असेल. या काळात तुम्हाला डोळे आणि दातदुखीचा सामना करावा लागणार आहे. यासाठी  “ॐ भौमाय नमः” मंत्राचा जप करा. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


या काळात तुमच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तसेच, व्यवसायात तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या सहकाऱ्यांमध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. यासाठी दररोज विष्णू नामाचा जप करा. 


कर्क रास (Cancer Horoscope)


बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमच्या करिअरवर देखील परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा वाढता ताण असेल. यासाठी तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तसेच, तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळात तुमच्या आरोग्यावरही विशेष लक्ष द्या. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे वादविवाद होऊ शकतात. कामाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, या काळात तुम्ही जितका पैसा कमवाल त्या पैशांची बचत करण्यात तुम्ही अयशस्वी व्हाल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


बुध ग्रह वृश्चिक राशीतच प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक आव्हानं येऊ शकतात. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. तसेच, तुम्हाला अचानक डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी “ॐ हनुमते नमः” या मंत्राचा 11 वेळा जप करा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :              


Shani Dev : 2025 वर्षात 'या' 3 राशींवर असणार शनीची ढैय्या आणि साडेसाती; तर 'या' राशींना मिळणार साडेसातीपासून मुक्ती