Weekly Horoscope 11 To 17 August 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. सध्या श्रावणमास (Shravan) देखील सुरु आहे. त्यामुळे या दरम्यान अनेक शुभ ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या शुभ ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम या आठवड्यातील राशींना नेमका कसा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी ऑगस्टा दुसरा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. या दरम्यान तुमच्या मेहनतीला चार चॉंद लागतील. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, तुमच्या करिअरला नवं वळण लागेल. प्रसिद्धीच्या झोतात तुम्ही असाल. सकारात्मक दृष्टीकोन राहील. कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. पार्टनरचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, या काळात ग्रहांची स्थिती देखील शुभ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा ताण घेण्याची आवश्यकता नाही. तुमच्यातील चांगलं व्यक्तिमत्व बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तसेच, या आठवड्यात खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक फटका बसू शकतो.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. या काळात तुमचं तुमच्या कामाप्रती प्रेम दिसून येईल. तसेच, समाजातील विभिन्न लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. नवीन गोष्टी तुम्ही आचरणात आणाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थकवा जाणवू शकतो. अशा वेळी कोणत्याच प्रकारचा मानसिक ताण घेऊ नका. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि निरोगी जीवनशैली फॉलो करा. आठवड्याच्या शेवटी कोणतीच जोखीम होती घेऊ नका. याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्ही स्वत:साठी वेळ काढणं फार गरजेचं आहे. तसेच, कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचा फोकस राहील. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या कामाचा विस्तार वाढलेला दिसेल, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तसेच, पैसा कमावण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या दरम्यान ना लाभ ना तोटा होणार आहे. तसेच, तुमच्या आवडीच्या कामासाठी वेळ काढा. या दरम्यान तुम्ही धार्मिक कार्यात देखील मग्न व्हाल. लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. कुटुंबातही चांगलं वातावरण राहील. वाद होणार नाहीत. मित्र-मैत्रीणींना भेटण्याचा योग देखील या दरम्यान येईल. या काळात पैशांचा व्यवहार करणं थोडं धाडसी असू शकतं.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळतील. तसेच, जे तरुण लग्नासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी चांगली स्थळं येतील. या आठवड्यात ग्रहांची स्थिती देखील या राशीवर चांगली असणाप आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरही याचा परिणाम दिसू शकतो. मात्र कोणाला पैसे उधारी देऊ नका. अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होईल. कोणाच्या अध्यात मध्यात पडू नका. आपल्या कामाशी काम ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :